Gatari Amavasya 2022: या अमावास्येची बात वेगळी

गोवा आणि महाराष्ट्राच्या (Maharashtra) काही भागात या अमावस्येला ‘गटारी’ म्हंटले जाते.
Gatari Amavasya 2022
Gatari Amavasya 2022Dainik Gomantak

आज आषाढी अमावस्या. या अमावास्येची चर्चा जितकी होते तितकी चर्चा अन्य अमावास्यांची होत नाही. या अमावास्येनंतर श्रावण महिना सुरू होतो. श्रावणात मासांहार करणे अनेक हिंदू टाळतात. अनेकजण गणेशचतुर्थीचा सण संपेपर्यंत शाकाहारीच राहतात. पण पुढील संपूर्ण महिना शाकाहारी राहायचे आहे, या जाणिवेने आदल्या रात्री, आषाढी अमावास्येच्या दिवशी मांस-मच्छी आणि मद्यपान यांचे मनसोक्त सेवनही करतात.

खरंतर अशा प्रकारची मौजमजा गोव्यात (Goa) अन्य निमित्तानेही अनेकदा होते पण या अमावास्येचे तेवढे दुर्भाग्य की त्या कारणावरून तिला ‘गटारी अमावस्या’ असे नाव पडले आहे. या दिवसात फेसबुकवर (facebook), व्हॉटसॲपवर या अमावास्येला ‘गटारी’ म्हणू नये याबद्दल उपदेशाचे आणि सल्‍ल्यांचे भरपूर डोस दिले जातात. अर्थात ‘पिनेवालों को पिने का बहाना चाहिए’ या पंथातले लोक अशा उपदेशांकडे सोयिस्कर दुर्लक्षही करतात. (Gatari Amavasya 2022 News)

Gatari Amavasya 2022
World Hepatitis Day 2022: हिपॅटायटीसमुळे होऊ शकते किडनी खराब

या अमावस्येला ‘गटारी’ म्हटले जात असले तरी त्या रात्री भरपूर मद्यपान करून कुणी एखादा गटारात पडला आहे असे दृश्‍यही दिसत नाही. पण ‘गटारी’ असा शब्द या अमावास्येच्या संदर्भाने वापरल्यामुळे अनेकांच्या धार्मिक भावना दुखतात हे मात्र खरे. ‘गटारी’ हा शब्द या अमावास्येच्या संदर्भात वापरला गेला नसता तर कदाचित श्रावण महिन्याच्या आदल्या रात्रीच्या अशाप्रकारच्या मौजमजेला केला जाणारा विरोध कदाचित थोडा सौम्यही होऊ शकला असता.

गोवा आणि महाराष्ट्राच्या (Maharashtra) काही भागात या अमावस्येला ‘गटारी’ म्हणत असले तरी देशाच्या अन्य भागात तिला इतर नावेही आहेत उदाहरणार्थ ‘हलाहरी’ (Halahari) अमावास्या किंवा ‘दीप’ अमावास्या. ही अमावास्या जर मंगळवारी आली तर तिला ‘भोमवती’ अमावास्याही म्हटले जाते. यापैकी दीप अमावस्या हे संबोधन अनेकांच्या परिचयाचे आहे. ‘हालाहारी’ हा शब्द शेतीसंबंधीत आहे. या दिवशी देशाच्या काही भागात शेतीच्या सर्व साधनांची पूजा केली जाते. या दिवशी झाडाचे एखादे रोपटेही लावले जाते.

अनेक ठिकाणी ही अमावस्या ‘दीप अमावस्या’ म्हणून प्रचलित आहे. या दिवशी तिथल्या सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा करतात. पूजेमध्ये पक्वांनाचा नैवेद्य दाखवला जातो. त्यावेळी म्हटला जाणारा मंत्र हा एक प्रकारे प्रकाशाची जणू प्रार्थनाच असते- ‘ दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसा तेज उत्तमम्’

गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव।।

याचा अर्थ होतो- हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. उद्यापासून श्रावण सुरू होत आहे. अनेकांच्या घरी संपूर्ण श्रावणात शाकाहारी, सात्विक जेवण असेल. अनेक जण ह्या संपूर्ण महिन्यात निग्रहाने मांस-मच्छी आपल्या आहरात (Diet) वर्ज्य करतील पण त्यातल्या बहुतेकांचे एक मागणे मात्र एकच असेल- ही आजची रात्र तेवढी जाऊ द्या!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com