'पाणक्षेत्रे' गोव्याच्या पर्यावरण अन् सौंदर्यामध्ये घालतात भर

Goa Tourism: पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या गोवा राज्यात आतापर्यंत सात अधिसूचित पाणक्षेत्रे आहेत.
Goa |Goa Tourism
Goa |Goa Tourism Dainik Gomantak

गोव्याच्या एका वैशिष्ट्याला आम्ही फारच गृहीत धरले आहे- ते म्हणजे गोव्यात असलेल्या पाणथळ जागा (Watland). या पाणथळ जागा पर्यावरणाच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत. ज्याची पण दुर्देवाने त्या धोक्यातही आहेत. गोव्यातील ह्या ओलसर प्रदेशांचा खाजन क्षेत्रे महत्त्वाचा भाग आहेत. ही सुपिक कृषी पर्यावरण व्यवस्था अनेक चुकीच्या कारणामुळे सतत चर्चेचा विषय बनलेली आहे. मानवी हस्तक्षेपामुळे, या अतिशय प्राचिन उत्पादक जमीनीची होणारी दुःस्थिती अभ्यासकांनी वेळोवेळी वेगवेगळ्या व्यासपिठांवरुन मांडली आहे. (Goa Watland Latest news)

आपल्यापैकी अनेकांना हे ठाऊक नसेल की राज्याच्या नद्यांत आणि या पाणथळ जाग्यात वेगवेगळ्या 84 प्रकारच्या माशांच्या प्रजाती आहेत. या 84 प्रजातीपैकी 18 प्रजाती अलीकडच्या काळातच ओळखल्या गेल्या आहेत. कवच असलेल्या 15 प्रजातीही या पाणथळ जाग्यांमधून मिळवून त्यांचेही वर्गीकरण करण्यात आले गेले आहे.

‘इंटरनॅशनल युनियन ऑफ कंझर्वेशन ऑफ नॅचर’ (आयुसीएन) नुसार त्यातल्या चार प्रजाती जवळजवळ अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत आणि पाच असुरक्षित आहेत. यासंबंधीचे संशोधन अजून चालूच आहे. या क्षेत्रातल्या आणखीही माशांच्या प्रजातीचा शोध लागून ही संख्या शंभरावर जाऊ शकते असा अंदाज आहे. गोव्यातील नद्या आणि पाणथळ प्रदेशातून दरवर्षी सुमारे 150 टन मासे (Fish) मिळतात हे तथ्य आहे.

भारत सरकारने 2017 मध्ये ‘पाणथळ जागा:

संवर्धन आणि व्यवस्थापन नियम’ या नावाने अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेच्या अनुषेगाने ‘गोवा वेटलॅण्ड अथॉरिटी’ (Goa Watland Authority) ची स्थापनाही अनिवार्यपणे झाली. या प्राधिकारीणीचीचे उद्दीष्ट होते-

* पाणथळ जागांच्या निट व्यवस्थापन करणे. यात तिथे होणारे पर्यावरणीय स्वरुपातील बदल शोधण्यासाठी नीट धोरणे आखून त्याप्रकारने कृती करणे.

* पाणथळ जागांची डिजीटल यादी बनवणे.

* या जागांच्या संरक्षणासाठी योग्य धोरण आखून त्या संबंधातल्या कार्यक्रमाची यादी बनवणे.

* पर्यावरणीय कार्य (जल साठवण, पुनर्भरण, पूर व्यवस्था) आणि तिथल्या सांस्कृतिक मूल्यांचे जतन करणे.

(Goa Watland Authority)

गोव्यातच (Goa) नव्हे तर जगभरातच पाण्याच्या जागा या मानवी कारभारामुळे चितेंच्या जागा बनून गेल्या आहेत. गोव्यातल्या या पाणथळ क्षेत्रांमुळेच मोसमात हजारो स्थलांतरीत पक्षी इथे येतात. या पक्ष्यांमुळे ही पाणथळ क्षेत्रे नेत्रदिपक बनतात.

या क्षेत्रात मिळणारे ‘खाद्य’ हाच त्या पक्ष्यांचा मुख्य निर्वाह असतो. या जागेतले मत्स्य उत्पादन अधिक चांगले करण्यासाठी मुख्य नद्यांच्या प्रवाहाशी जुळणाऱ्या त्यांच्या वाहिन्या रुंद करणे, ही जागा निर्जंतुक करणे, अशा जागांच्या जवळपास बांधकाम सदृश्‍य व्यवहारांना आळा घालणे वगैरे उपाय त्वरित हातात घेणे खूप आवश्‍यक आहे.

पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या गोवा राज्यात आतापर्यंत सात अधिसूचित पाणक्षेत्रे आहेत. आणखीतही अधिसूचित होण्याच्या मार्गावर आहेत. ही सारी पाणक्षेत्रे गोव्याच्या पर्यावरण सौष्ठवात भर घालणारी आहेत व गोव्याचे सौंदर्य अधिक वृद्धिंगत करणारीही आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com