धनगरी फुगडीचे धडे गुरू-शिष्य परंपरेचा आविष्कार..

एक वर्षाचा कार्यकाळ असलेला हा प्रशिक्षण वर्ग कोरोनामुळे लांबला.
धनगरी फुगडीचे धडे गुरू-शिष्य परंपरेचा आविष्कार..
Goa Culture : युवतींना धडे देताना 80 वर्षाच्या गुरू नागी नाऊ वरकDainik Gomantak

Goa Culture : गोव्यातल्या इतर फुगड्यांपेक्षा धनगरी फुगड्या ह्या वेग़ळ्या आहेत. धनगर समाजातील पारंपरिक फुगडी कलेची जोपासना व्हावी आणि धनगरी फुगडी अस्तित्वात रहावी यासाठी धनगरवाडा, भुईपाल येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘गुरू शिष्य परंपरा उत्तराधिकारी’ प्रशिक्षण वर्गाची सांगता झाली. ‘गोवा धनगर समाज सेवा संघा’ या संस्थेच्या पुढाकाराने आणि  ‘कला आणि संस्कृती संचालनालय’, गोवा सरकार यांच्या सहकार्याने हा प्रशिक्षण वर्ग जानेवारी 2020 साली सुरू झाला होता.

Goa Culture : युवतींना धडे देताना 80 वर्षाच्या गुरू नागी नाऊ वरक
Goa Wedding Destination: गोव्यातील अशा हॉटेल्सबद्दल जाणून घेवूया

एक वर्षाचा कार्यकाळ असलेला हा प्रशिक्षण वर्ग कोरोनामुळे लांबला. या प्रशिक्षण वर्गाच्या गुरू धनगर समाजातील ज्येष्ठ कलाकार नागी नाऊ वरक यां होत्या

82 वर्षे वयाच्या नागी नाऊ वरक या धनगर समाजातल्या ज्येष्ठ लोककला कलाकार आहेत. त्यांकडे धनगर लोककलेचा ठेवा असून, त्या समाजातील पाळणा गीते, हळदी गीते, ओव्या, धनगरी फुगडी या विविध धनगर लोककलेचा संपन्न वारसा त्या जपत आल्या आहेत. वयाची ऐंशी पार केली तरी आपल्याकडे असलेला हा सांस्कृतिक वारसा पुढे चालावा म्हणून त्या धडपडत आहेत. त्यांना राज्य सरकारच्या कला आणि संस्कृती खात्याचा ‘कला सन्मान पुरस्कार’ लाभला आहे. ‘गोवा धनगर समाज सेवा संघा’च्या वतीने तसेच या भागातील विविध सामाजिक संस्थांनी त्याचा सत्कार केला आहे.

Goa Culture : युवतींना धडे देताना 80 वर्षाच्या गुरू नागी नाऊ वरक
लहान मुलांना ही 5 सोशल स्किल शिकवली पाहिजेत

नागी नाऊ वरक या आपल्या उतार वयात धनगर समाजाची सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचे जे कार्य करीत आहेत ते अत्यंत कृतज्ञता बाळगण्यासारखे आहे. या प्रशिक्षण वर्गात गौरवी गंगाराम पावणे यां गुरू नागी नाऊ वरक यांच्या सहाय्यक होत्या.

पश्चिम विभाग सांस्कृतिक केंद्र उदयपूर यांची प्रशिक्षणाची ही मूळ योजना गोव्यात ‘कला आणि संस्कृती संचालनालय’ राबवते. हा प्रशिक्षणवर्ग आयोजित करण्यात सत्तरी तालुक्यातील नामवंत लोककला अभ्यासक प्रा. पोर्णिमा केरकर यानी सहकार्य केले. या ‘गुरू शिष्य परंपरा उत्तराधिकारी’ योजनेचा लाभ भुईपाल धनगर वाडा येथील सुषमा वरक, निर्जला वरक, मंजू वरक, सुषमा झोरे, चैताली वरक, प्रिती यमकर, निकिता वरक, भारती ताटे, रेश्मा वरक, भारती वरक या युवतींना झाला.

- बी. डी. मोटे

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com