गोव्यातील 'हे' पदार्थ आले तरी कुठून...

अशा विविध प्रकारच्या विदेशी पदार्थ गोव्यात आल्यामुळे लोकांच्या आहारात बदल झाला.
गोव्यातील 'हे' पदार्थ आले तरी कुठून...
Goa| Food |Goa CultureDainik Gomantak

गोव्याला खाद्यसंस्कृती, फॉरेन टच, आगळ्या-वेगळ्या सणांचा वारसा गोव्याला लाभलेला आहे. गोवा पर्यटनासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. येथील बीच, पदार्थ, सण, प्रत्येक पर्यटकाला प्रेमात पडतात. पण येथील स्वयंपाक घरात वापरात येणार पदार्थ नेमके कुठून आले हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊया गोव्यात फळे, भाजीपाला कुठून आले... (Goa Food Culture News)

'वास्को द गामा' ने 1498 मध्ये भारताकडे (India) जाण्यासाठी सागरी मार्गाचा शोध लावला. यामुळे भारत आणि पोर्तुगीज, ब्रिटिश, फ्रेंच आणि डच यांच्यातील सागरी व्यापार वाढू लागला.

तर मोगलांनी विदेशी लोकांना व्यापार करण्याच्या सवलती दिल्या. या सागरी व्यापाराने भारतात नवीन आणि विदेशी खाद्यपदार्थांचे आगमन झाले.

गोवा ही आशियातील पहिली युरोपीय वसाहत होती. गोवा पोर्तुगीजांचे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र बनले. आफ्रिका, इजिप्त, पर्शियन गल्फ आणि दक्षिण पूर्व आशियासह जगाच्या विविध भागांतून पदार्थ भारतात आले.

Goa| Food |Goa Culture
Goan Food: गोव्यातील 'हे' अनोखे रेस्टॉरंट्स

अशा विविध प्रकारच्या विदेशी पदार्थ भारतात आल्यामुळे लोकांच्या आहारात बदल झाला. 18 व्या शतकाच्या सुरुवातीस, दक्षिण भारतात तंबाखू, मिरची, चिकू, पेरू, सीताफळ, अननस, संत्री, काजू (Cashews) , पपई आणि ब्रेडफ्रूटची (मलयालम) लागवड सुरू झाली.

वास्को द गामा भारतात गोव्यात (Goa) येण्यापूर्वी भारतात तांदूळ, मसूर, कापूस, ऊस, गहू, ज्वारी आणि बाजरी यांची लागवड केली जात होती. भारतामध्ये मिरची, बटाटे, टोमॅटो, शेंगदाणे, अननस, पेरू, पपई, मका, कस्टर्ड सफरचंद किंवा भोपळे नव्हते. वास्को द गामा आल्यानंतर मिरची, शेंगदाणे, बटाटे, धणे, काजू, वांगी, अननस, पपई, तंबाखू आणि विदेशी प्रजाती अशी अनेक नवीन पिकाची लागवड करण्यात भारतात करण्यात आली.

* येथे काही खाद्यपदार्थांची यादी आहे आणि ते कोणत्या देशातून गोव्यात आणले गेले हे जाणून घेऊया

 • मिरची: दक्षिण अमेरिका

 • पेरू: पेरु शहर

 • गोड लिंबू: मोझांबिक

 • शिमला मिरची, बटाटा, गहू, टोमॅटो: लॅटिन अमेरिका

 • बिंबली: दक्षिण पूर्व आशिया

 • चिकू: ग्वाटामाला, मेक्सिको

 • कांदे: इजिप्त

 • लवंगा: इंडोनेशिया

 • संत्री: जपान

 • हिरवे वाटाणे, कोबी, फ्लॉवर: युरोप

 • खसखस: तुर्की

 • मोइरा केळी: आफ्रिका

 • कस्टर्ड सफरचंद: इंडोनेशिया, मलेशिया

 • काजू: ब्राझील

 • अननस, पपई: दक्षिण अमेरिका

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.