Goa Fruit Festival| Goa Culture |Goa Tourism
Goa Fruit Festival| Goa Culture |Goa TourismDainik Gomantak

Goa Fruit Festival: गोव्यात साजरा होतो फळांचा उत्सव

गोव्यातील (Goa) आणि कोकणातील, संपन्न फल आणि वृक्षसंपदेचे जे दर्शन तिथे होत होते ते नक्कीच अप्रुपाचे होते.

गोव्यात तीन वर्षांच्या अंतराने ‘फळ महोत्सव, साजरा झाला खरा, पण मधल्या काळातल्या औदासिन्याची छाया या महोत्सवावर पडलेली आहे हे जाणवत होते. स्पर्धेचा लांबलचक विभाग फळांनी अगदी भरुन गेलेला होता मात्र विक्रीसाठी किंवा उत्पादनाच्या प्रदर्शनासाठी असणाऱ्या स्टॉलवर मात्र पूर्वीसारखा उत्साह जाणवत नव्हता. तरी देखील गोव्यातील (Goa) आणि कोकणातील, संपन्न फल आणि वृक्षसंपदेचे जे दर्शन तिथे होत होते ते नक्कीच अप्रुपाचे होते.

इटुकल्या निवडुंगापासून ते उंच वाढणाऱ्या झाडापर्यंतची रोपटी प्रदर्शनात विक्रीला होतीच पण एरवी बाजारातून दृष्टिआड झालेली अनेक फळेही (Fruits) प्रदर्शनात मांडलेली दिसत होती. आपल्या अंगणात रोवण्यासाठी किंवा फ्लॅटच्या गॅलरीत मांडण्यासाठी रोपटी शोधणाऱ्या वृक्षप्रेमींची मांदियाळी अर्थातच या प्रदर्शनात होती. फळांच्या रसाच्या स्टॉलवर, क्वचितप्रसंगी एरवी चाखायला मिळणाऱ्या बेलफळाचे मधुर सरबत पिण्याची संधी या प्रदर्शनात अनेकांनी घेतली. मधुमक्षिका पालनासाठी असलेली साधनेही एका स्टॉलवर उपलब्ध होती. राजरोसपणे बाजारात उपलब्ध नसणारा औषधी मधही या स्टॉलवर विक्रीला होता.

या प्रदर्शनात एके ठिकाणी गोव्याचा ‘सान थॉम’ आंबाही विक्रीला होता. या आंब्याच्या जातीचे नाव अनेकांनी ऐकलेही नसेल’ हा ‘सान थॉम’ आंबा चवीला साधारण ‘मानकुराद’सारखाच असतो. आणि सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या जातीच्या आंब्याचे केवळ एकच झाड गोव्यात (Goa) अस्तित्वात आहे. वार्का येथील थॉमस दा कोस्ता यांच्या मालकीचे हे झाड आहे.

मांडवीच्या तीरावर भरलेल्या यंदाच्या यावर्षीच्या फळ महोत्सवाचा थाट जरी पूर्वीसारखा नसला तरी कोरोनाकाळातल्या ठप्प झालेल्या व्यवहारानंतरची ही सुरुवात आशादायक नक्कीच होती. आगळ्या आणि नव्या प्रकारच्या किंवा आपल्या इच्छेनुरूप रोपांच्या शोधात तिथे आलेल्या लोकांना या फळं महोत्सवाने निराश निश्चितच केले नसणार. तिथल्या झाडांना औत्सुक्याने निरखणांऱ्या नजरांवर कोरोना काळाची (Corona) छाया अजिबात जाणवत नव्हती हे काही कमी नव्हते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com