डोळे शाळांकडे लागले...

मोबाईलच्या स्क्रीनला मुले अधिक काळ चिकटून राहिली आणि या साऱ्या नकारात्मक बाबींचा परिणाम मुलांच्या मानसिक अवस्थेवर नक्कीच वाईट प्रकारे झाला.
डोळे शाळांकडे लागले...
डोळे शाळांकडे लागले... Dainik Gomantak

गोवा (Goa) सरकारने नेमलेल्या कृतिदलाने शाळा पुन्हा सुरू कराव्यात असा सल्ला गोवा सरकारला दिला आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळावे एकमात्र हेतू त्यामागे नाही तर गेले दीड वर्ष घरी बसून मुले ज्या विपरीत मानसिक स्थितीशी सामना करत आहेत त्यातूनही मुलांना बाहेर काढावे हा हेतूही त्यामागे आहे. सकाळी लवकर उठणे, वेळेवर खाणे यासारख्या आवश्यक शिस्तीला देखील मुले हरपली आहेत. खरं तर पालकांनी मुलांना घेऊन फिरणे कधीच सुरू झाले आहे. मुले आपल्या पालकांबरोबर रेस्टॉरंटमध्ये जातात, वाढदिवस आपल्या इतर मित्रांच्या बरोबरीनं साजरा करतात, लग्नाला हजेरी लावतात, शॉपिंग मॉलमध्ये दिसतात.

पण दरम्यानच्या काळात विद्यार्थिदशेतली ही मुले एका वेगळ्याच मानसिक अवस्थेचेमधून पार झाली. कोरोनाकाळाने या मुलांना सामाजिक एकांतवास, भय, अनिश्चितता, दुःख या साऱ्या गोष्टींशी झगडायला लावले. मोबाईलच्या स्क्रीनला मुले अधिक काळ चिकटून राहिली आणि या साऱ्या नकारात्मक बाबींचा परिणाम मुलांच्या मानसिक अवस्थेवर नक्कीच वाईट प्रकारे झाला. चित्तवृत्ती स्थिर राखणाऱ्या शक्ती कमकुवत झाल्या, मैत्रीत खंड पडला आणि त्यामुळे मुलांत, चिंता, ताण, भावनात्मक ताणाव या गोष्टींची वाढ झाली. शारीरिक हालचालींवर मर्यादा आल्यामुळे शारीरिक हानी झाली ती वेगळी. अचानक सामोरे आलेल्या एका वेगळ्या प्रकारच्या कैदेत मानसिक तोल ढळल्यामुळे काहीना आक्रमक वर्तन, पॅनिक अटॅक आणि पोस्ट ट्रोमॅटीक स्ट्रेस डिसॉर्डर यांनी ग्रासले. कुटुंबातील कर्ती आणि प्रिय व्यक्ती ज्यांना गमवावी लागली त्यांना या मानसिक आजारांची तीव्रता अधिकच जाणवली.

डोळे शाळांकडे लागले...
संत गोरोबाशी नाते सांगणारा माती हस्तकारागिरीचा व्यवसाय..

आज शाळा सुरू होण्याच्या या काळात अनेक पालकांना याची जाणीव होईल की त्यांच्या पाल्यांना शाळेचे गणवेश नीट होत नाहीत. कमरेवर, पोटावर ते अधिकच घट्ट होत आहेत. गेले दीड वर्ष टीव्ही पाहणे, इंटरनेट सर्च करणे, तासनतास ऑनलाइन गेम खेळणे यातून अनेक किशोरवयीन मुलांनी लठ्ठपणा विकसित केला असेल. पालकांना आपली मुले गुबगुबीत झाल्याचा आनंदही होत असेल कदाचित, पण त्यांच्या मुलांचे ते वाढलेले दहा बारा किलो वजन त्यांच्या भावी मधुमेहाचे आणि उच्च रक्तदाबाचे कारणही होऊ शकते हे समजून घेऊन पालकांनी सावध राहणे गरजेचे आहे.

ओकाऱ्या आणि वांत्या येणाऱ्या मुलांचे निदान करणाऱ्या डॉक्टरांचे निरीक्षण असे आहे की ही मुले दुपारी बारा वाजता उठतात, एक वाजता नाश्ता आणि पाच वाजता जेवण घेतात. अशा कारणांमुळे पोटाचे बिघडणे सुरू होऊन त्यांना त्रास सहन करावा लागतो. डॉक्टर म्हणतात, प्रमाणाबाहेर मोबाईलच्या स्क्रीनला वेळ दिल्याने मुलांना मानदुखी, पाठदुखी यासारखे विकारही जडलेले आहेत. डोळे तांबडे होणे, डोळ्यांतून पाणी येणे ही या काळात सर्वसामान्य व्याधी झाली आहे.

पालकांना आपल्या मुलांवर सर्वकाळ नजर ठेवणे शक्य नसते त्यामुळे सामाजिक माध्यमात आपली मुले कशाप्रकारे वावरतात याचेही ज्ञान त्यांना नसते. राज्याच्या बालकल्याण खात्याकडे किशोरवयीन मुलींच्या ऑनलाईन शोषणाच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. अनेक मुलींनी अनोळखी व्यक्तींकडून फ्रेंड-रिक्वेस्ट स्वीकारल्या आणि त्यामुळे त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर पस्तावण्याची पाळी आली. त्यांना घरगुती हिंसाचाराची झळ बसली आणि त्याचा परिणाम म्हणून अनेकांच्या मनात आत्महत्येचा विचारही बळावला. स्थलांतरित कुटुंबातील मुलांना तर या कोरोनाकाळाचे परिणाम अतिशय शोचनीय प्रकारे भोगावे लागले. त्यांची शाळा पूर्णपणे हुकली. काहीजण तर शाळेत परत येणारच नाहीत.

डोळे शाळांकडे लागले...
बाळ बाळंतीण आणि गोमंतकीय रीतीभाती

कोरोनाकाळाने मुलांच्या भावअवस्थेवर अशातऱ्हेने फार विघातक स्वरूपाचा परिणाम घडवून आणला. काही सुदैवी मुले या प्रकारच्या आघातातून केवळ भक्कम कुटुंबव्यवस्थेमुळे वाचली, परंतु जी मुले अशा प्रकारच्या विपरीत मनोवस्थेतून गेली आहेत त्यांना सावरणे आवश्यक आहे. शाळा सुरू होण्याचा काळ आता जवळ आला आहे. साऱ्या मुलांना हवे आहे एक निकोप आणि प्रगतिशील वातावरण. शाळांचेदेखील हे कर्तव्य असेल की दीड वर्षानंतर आपल्या दुसऱ्या पण महत्त्वाच्या घरी परतणाऱ्या या मुलांना समजून घेऊन, त्यांना पुन्हा जीवन सज्ज करणे. ‘गुरुर्देवो महेश्वरः’ हे सिद्ध करायची पाळी आता शाळांची आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com