
इतिहास हा अलीकडच्या काळात अनेकांसाठी, फेसबुकवर (Facebook) चघळायचा विषय बनला आहे. पूर्वी गावांगावांतून होणाऱ्या ऐतिहासिक नाटकांमधून नाट्यलेखक आपापल्या कुवतीनुसार इतिहासाची मांडणी करून तथाकथित ऐतिहासिक नाटके लिहायचे. पण त्यातल्या इतिहासाचे तपशील फारसा गांभीर्याने न घेता, दुसऱ्या दिवशी, शिवाजीच्या आणि औरंगजेबाच्या भूमिका गावातल्या अमूक-अमूक नटाने कशा आवेशपूर्ण रंगवल्या याचीच अधिक चर्चा व्हायची. अर्थात इतिहासाचीही प्रेक्षकांना ढोबळपणे ओळख व्हायची ही गोष्ट वेगळी. पण आता फेसबुकवर, आपापल्या पंथाचा इतिहास अहमहमिकेने मांडण्यात सत्याचा कसा अपलाप होतो याचे भान भल्याभल्यानांही राहिलेले नाही.
अशावेळी इतिहासकालीन स्थळांना भेट देऊन, त्या जागेचे सौंदर्य लक्षात घेता घेता इतिहासाचा धांडोळा घ्यायचा प्रयत्न करणे अधिकच औचित्यपूर्ण असते. इतिहासासंबंधी आपण बाळगत असलेले अनेक विभ्रम अशा जागांवर प्रत्यक्ष पोहोचता नाहीसे होतात. विषयात अधिक सखोल जाण्याची ओढही लागते.
कदंब राजघराण्याने गोव्यावर (Goa) सुमारे तीनशे वर्षे राज्य केले. पण त्यावेळी आताच्या गोव्याबरोबरच शेजारच्या प्रदेशातही त्यांचा अमल होता. ‘चंद्रपूर’ (आताचा चांदोर) ही जशी त्यांची एकेकाळची राजधानी होती तसाच कर्नाटकांमधील ‘हळशी’ गाव देखील कधीकाळी कदंब राजवंशाची (पूर्वीची) राजधानी होती.
पेडणे (Pernam) येथील संत सोहिराबानाथ आंबिये शासकीय महाविद्यालयाने अलीकडे गोवा कदंब काळातील कर्नाटक (Karnatak) राज्यात असलेल्या प्राचीन स्थळांची शैक्षणिक सहल आयोजित केली होती. हळशी, देगोळहल्ली, देगाव आणि कित्तूर या कर्नाटकात असलेल्या गावांची ही सहल होती.
या गावांत केंद्र सरकारमार्फत अधिसूचित झालेली अनेक पुरातत्त्व स्थळे आहेत. या सहलीविषयी (Trip) माहिती देताना कॉलेजच्या इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. झेवियर मार्टिन्स म्हणाले की ‘अशा सहलींमुळे विद्यार्थ्यांना वर्गात शिकण्याच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेता येतो’. सहलीचे निमंत्रक, इतिहास विभागाचे प्राध्यापक डॉ. रोहित फळगांवकर यांनीही प्रा. मार्टिन्स यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला.
‘विशेषतः सामाजिक विषयांच्या बाबतीत विद्यार्थ्यांना वर्गात शिकवल्या जाणाऱ्या तपशीलांचा अनुभव घेता येत नाही. अशा सहली विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रवृत्त करतात. विद्यार्थ्यांपैकी काहींनी इतिहासात करियर करण्याचाही निर्णय घेतला आहे.’ विद्यार्थ्यांना अशा सहलींसाठी का प्रोत्साहन दिले पाहिजे याचे इंगीतच या प्राध्यापकांनी सांगितले. या सहलीत सुमारे बावीस विद्यार्थी आणि दहा शिक्षक सहभागी झाले होते. अशा सहली म्हणजे एक प्रकारे काळाचे लंघनच असते.
पेडणे येथील संत सोहिराबानाथ आंबिये शासकीय महाविद्यालयाने अलीकडे गोवा कदंब काळातील कर्नाटक राज्यात असलेल्या प्राचीन स्थळांची शैक्षणिक सहल आयोजित केली होती. हळशी, देगोळहल्ली, देगाव आणि कित्तूर या कर्नाटकात असलेल्या गावांची ही सहल होती. या गावांत केंद्र सरकारमार्फत अधिसूचित झालेली अनेक पुरातत्त्व स्थळे आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.