
Travel Tips In Summer: मार्च महिना सुरू झाला की उन्हाच्या झळा लागलया सुरूवात होतो. या दरम्यान लोक बदलत्या ऋतूमध्ये प्रवास करण्याचा विचार करतात. मार्च महिन्यात मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर काही लोक ट्रिपचा प्लॅन करतात.
आता जेव्हा प्रेक्षणीय स्थळांचा विचार केला जातो तेव्हा ठिकाणाची योग्य निवड करणे खूप महत्वाचे असते. जर प्लेस परफेक्ट असेल तर ट्रीप देखील संस्मरणीय होते. मार्च महिन्यात तुम्ही ट्रिपला जाण्याचा विचार करत असाल तर तर काही ठिकाणांना भेट देणे टाळावे.
मार्च महिन्यात काही ठिकाणी खूप ऊन पडते. आम्ही तुम्हाला असा काही ठिकाणांची नावे सांगणार आहोत जेथे तुम्ही उन्हाळ्यात भेट देणे टाळावे.
गोवा
गोवा पर्यटनासाठी खुप प्रसिध्द आहे. तुम्ही हिवाळ्यात गोव्याला भेट देउ शकता. जर तुम्ही मार्चमध्ये गोव्याला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही येथे जाणे टाळावे. कारण या काळात तेथे उष्णता झपाट्याने वाढत असते.
जैसलमेर
जर तुम्हाला उन्हाळ्यात प्रवास करणे आवडत नसेल तर तुम्ही जैसलमेरला जावु नका. हे ठिकाण वाळवंटाच्या जवळ आहे. त्यामुळे उन्हाळ्यात येथील तापमान खूप वाढते.
चेन्नई
तामिळनाडूची राजधानी चेन्नई हे अतिशय गरम शहर आहे. मार्चमध्ये या ठिकाणी चुकूनही भेट देउ नका. गरमी मुळे तुम्हाला ट्रीपचा आनंद घेता येणार नाही.
खजुराहो
जर तुम्हाला ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्यायला आवडत असेल तर ही चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही जर मार्चमध्ये खजुराहोला भेट देण्याचा विचार करत असाल तर हा प्लॅन कॅन्सल करा. सप्टेंबर ते फेब्रुवारी हा येथे भेट देण्याचा उत्तम काळ आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.