Travel Tips: Romantic Date ला जाणार असाल तर गोव्यासह 'या' राज्यात घ्या 'हाउसबोट'चा आनंद

Romantic Date Tips: गोव्यात तुम्ही बीच पार्टीसह रोमँटिक डेटसाठी हाऊसबोटचा पर्याय निवडून पार्टनर करु शकता खुश
Travel Tips
Travel TipsDainik Gomantak

Houseboat Travel Destination: आपला देश हा संस्कृतीने समृद्ध आहे. हे विविध प्रकारचे रोमांचक अनुभव देते. मग तो ऐतिहासिक भव्य राजवाडे, इमारती आणि किल्ल्यांचा विषय असो किंवा अद्भूत आणि अविश्वसनीय धार्मिक आणि निसर्गरम्य ठिकाणांचा विषय असो. भारतात (India) पाहण्यासारखे अनेक ठिकाणे आहेत. सर्व प्रकारच्या लोकांच्या आवडीनुसार अशी जागा आहे, जिथे लोक जाऊन आनंद घेऊ शकतात. जर तुम्हाला भटकंती आणि नव नव्या ठिकाणी फिरायची आवड असेल, परंतु कुठे जायचे याचा प्लॅन बनवू शकत नसाल? जर तुम्ही एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल आणि काही वेगळे शोधत असाल तर आम्ही तुम्हाला बेस्ट सांगणार आहोत. हाऊसबोट (Houseboat) तुमच्यासाठी एक सुंदर, रोमँटिक पर्याय असू शकते.

  • गोवा

गोव्यात (Goa) विविध संस्कृती आणि खाद्यपदार्थांचा आनंद लूटू शकता. तसेच गोव्यात बीच पार्टी आणि नाईट लाइफसह तुम्ही परफेक्ट हाऊसबोटचा अनुभवही घेऊ शकता. या प्रवासादरम्यान, तुम्ही गोव्यात वॉटर एक्टिविटीज करु शकता.  हा प्रवास तुमच्यासाठी परफेक्ट रोमँटिक डेट ठरु शकते.

  • कर्नाटक

कर्नाटकातील स्वर्ण नदीत हाऊसबोटीचा पर्याय तुम्हाला नक्की आवडेल. येथील संस्कृती, नारळ शेती आणि इतर अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. लक्झरी हॉटेल्सच्या भाड्यापासून ते सर्वसामान्यांच्या बजेटपर्यंत सुंदर आणि भव्य सुसज्ज हाऊसबोटचा पर्याय आहे.

  • केरळा

जेव्हाही आपण बॅकवॉटर आणि हाउसबोट्सचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे केरळ. येथील केट्टा वल्लम नावाने ओळखली जाणारी हाऊसबोट खूप प्रसिद्ध आहे. अलेप्पी, कुमारकोम आणि कोवलम ही हाउसबोट अॅडवेंचरसाठी केरळमधील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर ठिकाणे आहेत.

  • श्रीनगर

जर तुम्हाला उन्हाळ्यात (Summer) हाऊसबोट टूर करायची असेल, तर श्रीनगर हे त्यासाठी योग्य ठिकाण ठरू शकते. दल सरोवरावरील हाऊसबोट एक सुंदर स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटते.

  • आसाम

आसाम हे भारतातील (India) अतिशय सुंदर राज्य आहे. हे हिल स्टेशनसाठी प्रसिद्ध आहे. आसाममधील चहाच्या बागांचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. तसेच हे ब्रह्मपुत्रा नदीसाठी देखील ओळखले जाते. येथे तुम्ही हाउसबोट क्रूझचा आनंद घेऊ शकता. तसेच डॉल्फिन आणि विविध पक्षीही पाहायला मिळतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com