श्री गणेशाला ओवाळताना गोमंतकन्या

गोमंतकीय ‘सेलिब्रिटी’ स्त्री कलाकारांची खास रंगदेखणीसाठी छायाचित्रे
श्री गणेशाला ओवाळताना गोमंतकन्या
श्री गणेशाला ओवाळताना गोमंतकन्याDainik Gomantak

ज्योतीने तेजाची आरती

गणेश चतुर्थीच्या दिवसात घर माणसांनी आणि प्रसन्नतेनं भरून असतं. विघ्नहर्त्या गणेशाची घरात झालेली स्थापना हे एक कारण असतंच, पण या उत्सवात असलेली पक्वान्नांची रेलचेल हेदेखील घरातल्या माणसांनी प्रसन्नवदनी असण्याचं आणखीन एक कारण असतं. गणपतीच्या दिवसांत गृहिणींचा स्वयंपाकघरातला अखंड राबता हा जणू ठरून गेलेला वार्षिक रिवाज असतो. त्यांच्या हातचे ‘मीठ- मिरची’ चे भानच गणपतीसमोर बसलेल्या पंगतीला बहारीने रसरशीत बनवते. गणपतीची आरास आणि केळीच्या पानात मांडलेल्या पदार्थांची रंगसंगत यात देवाला निवड करायला सांगितलं तर निःसंशयपणे घरातल्या ‘तिचे’ च हात जिंकतील. आधुनिक युगात हीच गृहिणी ‘सहस्त्र कर नारी’ बनून या युगाच्या साऱ्याच आव्हानांना सक्षमतेने सामोरी जाताना दिसते. ती गृहिणी आहे, माता आहे आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा भिडवून नव्या विश्‍वाचा शोध घेण्यास सरसावलेली ती धुरंधर मानवही आहे. अनादी अनंत असलेल्या दिव्य पारलौकिकतेचे जेव्हा ती औक्षण करते तेव्हा ज्योतीने केलेली तेजाची ती आरतीच असते.

वर्षा उसगांवकर
वर्षा उसगांवकर Dainik Gomantak
स्नेहल शेट्ये
स्नेहल शेट्ये Dainik Gomantak
समीक्षा देसाई
समीक्षा देसाई Dainik Gomantak
माधुरी शेटकर
माधुरी शेटकर Dainik Gomantak
प्रियंका तालक
प्रियंका तालक Dainik Gomantak

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com