Mother's Day 2022 Google Doodle: मदर्स डे निमित्त गूगलने शेअर केलं हृद्यस्पर्शी डूडल

'मदर्स डे' च्या शुभेच्छा देण्यासाठी गूगलने खास शेअर केलं गूगल डूडल.
Mother's Day 2022 Google Doodle
Mother's Day 2022 Google DoodleDainik Gomantak

भारतासह जगभरात आज 8 मे हा दिवस मदर्स डे (Mother's Day) साजरा केला जात आहे. या खास दिवसानिमित्त गूगलनेही (Google) खास गूगल डूडल (Google Doodle) लॉंच केले आहे. जगातील सार्‍या आईपण जपणार्‍या महिलांसाठी आजचं खास गूगल डूडल समर्पित करण्यात आलं आहे. आई आणि मुलाचं जिव्हाळ्याचं नातं गूगल डूडल मध्ये सुंदरतेने सादर करतांना दिसत आहे. (Mother's Day 2022 Google Doodle news)

गूगलने शेअर केलेल्या GIF मध्ये बदलणार्‍या आजच्या गूगल डूडलमध्ये आई मूलाला शिक्षणाचे, पाणी जपून वापरण्याचे आणि वृक्षलागवडीचे संदेश देत असल्याचे पहायला मिळाले आहे. यामधून आई-मुलाचे गोड नातं पहायला मिळत आहे.

Mother's Day 2022 Google Doodle
Mother's Day Recipes: आजच्या खास दिवशी आईसाठी बनवा स्वादिष्ट पदार्थ

1908 मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती वुड्रो विल्सन यांनी एक कायदा बनवला, ज्या अंतर्गत दरवर्षी मे महिन्याच्या दुस-या रविवारी 'मदर्स डे' (Mothers Day) साजरा केला जातो. मदर्स डे हा अमेरिकेमध्ये 'Honoured National Holiday' म्हणून ओळखला जातो. पण सर्वत्र पब्लिक हॉलिडे नसतो. प्रत्येक देशामध्ये मदर्स डे साजरा करण्याची तारीख वेगवेगळी आहे. पण मे महिन्यातील दुसरा रविवार हा मदर्स डे जगात 50 देशांमध्ये साजरा केला जातो. भारतामध्ये आजच्या दिवशी मदर्स डे साजरा केला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com