Covid-19 Prevention Google Doodle: गूगलने डूडल बनवून सांगितले कोरोना टाळण्यासाठीचे उपाय

Google has made doodles to convince people of the importance of masks
Google has made doodles to convince people of the importance of masks

कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता पुन्हा एकदा सर्व लोक चिंतेत पडले आहेत. त्याचबरोबर कोरोना विषाणूचा  वाढता प्रसार लक्षात घेता गुगलने देखील लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. डूडल बनवून गुगलने लोकांना कोरोनापासून दूर राहण्याचा संदेश दिला आहे. गूगलने डूडल बनवून लोकांना मास्कचे महत्त्व पटवून दिले आहे. तसेच, आपण कोरोना संक्रमणापासून स्वतःचे संरक्षण कसे करू शकतो हे देखील सांगितले आहे. मास्क आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे याबद्दल माहिती दिली गेली आहे. एवढेच नव्हे तर डूडलमध्ये कोरोना विषाणू टाळण्यासाठी सूचनाही दिल्या आहेत. wear a mask and save a life असा संदेशही दिला आहे. या संदेशामध्ये मास्क लावा, हात धुवा, आणि सुरक्षित अंतर ठेवा असा संदेश दिला आहे.

कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी गुगलने लोकांना हा प्रकार सांगितला

-आपले हात नेहमी स्वच्छ करा. हात स्वच्छ करण्यासाठी साबण आणि पाणी वापरा. आपण यासाठी अल्कोहोल-आधारित सॅनिटायझर देखील वापरू शकता.

-खोकतांना किंवा शिंकतांना सुरक्षित अंतर ठेवा.

-मास्क परिधान करा. जिथे सोशल डिस्टंन्स शक्य नाही अशा ठिकाणी मास्क हटवू नका.

-डोळे, नाक किंवा तोंडाला अजिबात स्पर्श करू नका.

- खोकला किंवा शिंकताना आपले नाक आणि तोंड टिश्यू पेपरने झाकून घ्या.
आपणाला अस्वस्थ वाटत असल्यास घरीच रहा, बाहेर पडू नका.
जर आपल्याला ताप, खोकला आणि श्वास घेण्यात त्रास होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा आणि उपचार घ्या.

-मास्क घालणारे इतरांना विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखू शकतात. मान्य आहे फक्त मास्क आपलं कोरोनापासून संरक्षण करू शकत नाही म्हणून सामाजिक अंतर ठोवणे आणि आपले हात स्वच्छ ठेवणे देखील आवश्यक आहे. आपल्या स्थानिक आरोग्य प्राधिकरणाने दिलेल्या सल्ल्याचे अनुसरण करा.
गूगलने यापूर्वी डूडल बनवून कोरोना वॉरियर्सचे आभार मानण्याचे काम केले होते. गुगलने आपल्या डूडलमध्ये आपत्कालीन सेवा कामगार, डॉक्टर, परिचारिका, प्रसूती कर्मचारी, शेतकरी यांचे डूडल्स बनवून आभार मानले होते.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com