किचनमधला कचरा वापरा अन् झाडांना बनवा हिरवेगार

जर तुम्हीही स्वयंपाक घरातील कचरा फेकून देत असाल तर ही बातमी नक्की वाचा.
Kitchen Hacks
Kitchen HacksDainik Gomantak

Grading Tips: तुम्हीही किचनमधला कचरा फेकत असाल तर ही बातमी शेवटपर्यंत पुर्ण वाचा. कारण त्या कचऱ्याचा वापर करून तुम्ही बागेतील झाडे हिरवेगार करू शकता.

बागकाम म्हणजे फक्त दिवसातून दोनदा झाडांना पाणी देणे नव्हे. तर कोणत्या झाडाला पाणी आणि खत कधी आणि किती प्रमाणात लागते याची अचूक माहिती असणे सर्वात महत्त्वाचे आहे. किचनमधला कचरा वापरून तुम्ही कोणत्याही खर्चाशिवाय रोपे हिरवीगार ठेवू शकता.

  • फख आणि भाज्यांची साल

तुम्ही भाज्यांची साल खत म्हणून वापरू शकता. भाज्यांची साल रोपांच्या मुळात टाकल्याने त्यांची चांगली वाढ होते. यामुळे भाज्यांची साल कचरापेटीत टाकून न देता झाडांच्या मुळात टाकावी.

  • वापरलेली चहा वापडर

चहा बनवल्यानंतर उरलेली चहा पावडर डस्टबिनमध्ये टाकण्याऐवजी झाडांच्या मुळांमध्ये टाकल्यास अनेक फायदे होतात. यामुळे मातीची गुणवत्ता वाढून झाड मोठे होतात आणि फुल-फळ देखील भरपुर लागतात. याशिवाय तुम्ही अशा प्रकारे कॉफी पावडर देखील वापरू शकता.

Kitchen Hacks
Smart Cooking Hacks: 'या' टिप्स वापरून दह्याचा आंबटपणा करा कमी
  • केळीचे साल

केळ्याप्रमाणेच त्याची साल पोटॅशियम, फॉस्फरस आणि इतर अनेक सूक्ष्म पोषक घटकांनी समृद्ध असते. केळीचे साल देखील रोपांसाठी फायदेशीर ठरू शकते. तुम्ही केळीच्या सालीचे लहान तुकडे करून किंवा पेस्ट बनवून तुमच्या रोपांमध्ये टाकू शकता.

  • अड्यांचे कवच

रोपांची चांगली वाढ होण्यासाठी तुम्ही अड्यांची टरफल वापरू शकता. यासाठी अंड्याचे कवच बारिक करून कुंडीतील रोपांमध्ये टाकू शकता.

  • पेपर नॅपकिन

किचन आणि डायनिंग टेबलवर ठेवलेला पेपर टॉवेल आणि टिश्यू देखील सेंद्रिय खत म्हणून वापरू शकता. ते वापरल्यानंतर ते ओले करावे आणि कुंडीमध्ये ठेवावे. हे लक्षात ठेवा की ते जास्त प्रमाणात असू नये.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com