सुंदर त्वचेसाठी ग्रीन टी फेस पॅक लाभदायी

हळद सर्व प्रकारच्या त्वचेसाठी चांगली असते.
सुंदर त्वचेसाठी ग्रीन टी फेस पॅक लाभदायी
Green Tea Face Pack is beneficial for beautiful skin Dainik Gomantak

ग्रीन टी (Green Tea) फक्त आरोग्यासाठी (Health) नाही तर आपल्या त्वचेसाठी (Skin) सुद्धा फायदेशीर आहे. तेलकट त्वचेसाठी (Oily Skin) ग्रीन टी फेस पॅक चांगले आहे, पण जेव्हा त्यात काही गोष्टी मिक्स करून त्वचेवर लावतात तेव्हा ते सर्व प्रकारच्या त्वचेसाठी चांगले असते. आज आम्ही अशाच फेस पॅक बद्दल सांगणार आहोत.

* हळद आणि ग्रीन टी फेस पॅक

हळद सर्व प्रकारच्या त्वचेसाठी चांगली असते. त्यात अँटीऑक्सिडंट आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत. जे आपल्या त्वचेमधील तेलकटपना आणि मुरूम कमी होण्यास मदत करते.

* साहित्य

  • 1/4 चमचा हळद

  • 1 छोटा चमचा ग्रीन टी

  • 1 चमचा बेसण

* कृती

सर्व साहित्य एकत्र मिक करावे. हे मिश्रण 20 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे. नंतर स्वच्छ पाण्याने धुवावे. असे आठवड्यातून दोनदा करावे.

Green Tea Face Pack is beneficial for beautiful skin
Yoga And Skin Care: निरोगी त्वचेसाठी करा योगासन

* तांदळाचे पीठ आणि ग्रीन टी फेस पॅक

लिंबाचा रस चेहऱ्यावरील मुरूम कमी करण्यास मदत मिळते. तसेच चेहऱ्यावरील डाग कमी होते. तर तांदळाचे पीठ त्वचेवरील तेलकटपणा कमी करतो.

* साहित्य

  • 2 चमचे तांदळाचे पीठ

  • 1 चमचा लिब्ऊ रस

  • 1 चमचा ग्रीन टी

* कृती

सर्व साहित्या मिक्स करावे. हे मिश्रण 15 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे. असे आठवड्यातून दोनदा केल्यास चेहऱ्यांवरील तेलकटपणा कमी होतो.

Green Tea Face Pack is beneficial for beautiful skin
Skin Care Tips: नितळ त्वचेसाठी पालकाचे करावे सेवन

* मध आणि ग्रीन टी फेस पॅक

मध आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी लाभदायी असते. त्वचेवरील डाग कमी होण्यास आणि त्वचा ग्लोइंग होण्यास मदत करते. ग्रीन टी तुमच्या त्वचेच्या अँटिऑक्सिडेंट अडथळ्याला बळकट करते.

* साहित्य

  • 2 चमचे मध

  • 1 चमचा ग्रीन टी

* कृती

दोन्ही साहित्या चांगले मिक्स करावे. नंतर 15 मिनिटे चेहऱ्यावर ठेवावे. नंतर थंड पाण्याने स्वच्छ चेहरा धुवावा. असे आठवड्यातून एकदा करू शकता.

Related Stories

No stories found.