Groundnut Benefits: शेंगदाणे खात असाल तर 'हे' वाचाच

Groundnut Benefits: आजार नियंत्रित करण्यासाठी भूईमगाच्या शेंगा उपयुक्त ठरतात.
Groundnut Benefits
Groundnut BenefitsDainik Gomantak

Groundnut Benefits: आपल्या आहारात समावेश असलेल्या भाज्या, फळे आणि कंदमुळे यामध्ये पौष्टिक घटकांचा समावेश असतो. त्याचा आपल्या शरीरासाठी फायदा होताना दिसतो.

काहींमध्ये असे काही गुणधर्म असतात जे आपल्या आजाराला नियंत्रित करण्यात मदत करताना दिसतात.

भूईमूग असाच एक घटक आहे, ज्यामुळे तुमच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवता येणे शक्य आहे. यासोबतच आपल्या इतर आजारांपासून सुटका मिळू शकते किंवा आजार नियंत्रित करण्यासाठी भूईमगाच्या शेंगा उपयुक्त ठरतात.

चला तर जाणून घेऊयात भूईमूगाचे आपल्या शरीरासाठी काय फायदे आहेत.

Groundnut Benefits
Exhaust Fan: घरातील एक्झॉस्ट फॅनच्या आवाजाने त्रस्त आहात? लगेच करा 'हे' 5 उपाय

1. मधुमेहाच्या टाइप २ ला नियंत्रित करते

एका संशोधनात असे दिसून आले आहे की शेंगदाणे खाल्ल्याने महिलांमध्ये टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो. शेंगदाण्यात ह कमी ग्लायसेमिक असते, ते खाल्ल्याने रक्तातील साखर वाढत नाही.

शेंगदाण्यामध्ये भरपूर मॅग्नेशियम असते जे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. जर तुम्ही दिवसातून 28 शेंगदाणे खाल्ले तर तुम्हाला दैनंदिन गरजेच्या 12 टक्के मॅग्नेशियम मिळेल.

2. सूज कमी करते

शेंगदाणे हे फायबरचा समृद्ध स्रोत आहे, जे तुमच्या शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करते आणि तुमचे पचन व्यवस्थित ठेवण्यास देखील मदत करते.

3. कर्करोगाचा धोका कमी होईल

शेंगदाणे किंवा पीनट बटर खाल्ल्याने गॅस्ट्रिक नॉनकार्डिया एडेनोकार्सिनोमा नावाच्या पोटाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होण्यास मदत होते.

4. हृदयासाठी चांगले

इतर ड्रायफ्रुट्सप्रमाणेच शेंगदाणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते. शेंगदाणे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून हृदयविकार टाळण्यास मदत करते.

शेंगदाण्याचे सेवन कसे करावे?

1. रात्री झोपण्यापूर्वी शेंगदाणे साधारण ६ ते ८ तास पाण्यात भिजत ठेवावेत.

2.सकाळी तुम्ही ते नाश्त्यापूर्वी किंवा सोबत खाऊ शकता.

3. रात्री शेंगदाणे खाणे टाळा, कारण शेंगदाणे पचायला जास्त वेळ लागतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com