Guava Health Benefits : पेरूचे हे आश्चर्यकारक फायदे शरीरासाठी अत्यंत गरजेचे; आजच करा आहारात समावेश

पेरू हे एकमेव फळ आहे ज्याचा आहारात समावेश मधुमेह, कर्करोग, त्वचेचे आरोग्य, पचन आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी केला जातो.
Guava Health Benefits
Guava Health BenefitsDainik Gomantak

Guava Health Benefits : पेरू हे एकमेव फळ आहे ज्याचा आहारात समावेश मधुमेह, कर्करोग, त्वचेचे आरोग्य, पचन आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी केला जातो. इतकेच नाही तर त्याची पाने हर्बल चहा म्हणूनही वापरता येतात.

यामध्ये मुबलक प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम आणि फायबर असतात जे एकंदर आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. पेरू त्याच्या अनोख्या चवीसाठी ओळखला जातो. पेरूचे सेवन फक्त हिवाळ्यातच केले जात असले तरी त्यामुळे ऋतूतील सर्दी, तापापासून बचाव होतो. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासोबतच इतर समस्यांमध्ये पेरू फायदेशीर ठरू शकतो.

Guava Health Benefits
Cheese Garlic Bread Recipe : घरी क्रिस्पी चीज गार्लिक ब्रेड बनवणं कठीण वाटतंय? मग ही रेसिपी एकदा वाचाच

मधुमेह नियंत्रित

पेरूमध्ये असलेले फायबर रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त भूमिका बजावू शकते. सालीसोबत पेरू खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. अनेक अभ्यासातून असेही समोर आले आहे की पेरूच्या पानांचे अर्क टाइप 2 मधुमेहाविरूद्ध अँटीहाइपरग्लाइसेमिक प्रभाव असू शकतात, जे रक्तातील साखर कमी करण्यासाठी कार्य करू शकतात.

रोगप्रतिकारक शक्ती

पेरू हा व्हिटॅमिन सीचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो. व्हिटॅमिन सीच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. पेरूमध्ये अँटी-मायक्रोबियल फायदे आहेत जे खराब बॅक्टेरिया आणि व्हायरस नष्ट करण्याचे काम करतात. हे सर्दी आणि फ्लूची लक्षणे देखील कमी करू शकते.

कर्करोगात फायदेशीर

पेरूच्या पानांचे अर्क कर्करोगविरोधी मानले गेले आहे. पेरूच्या पानामुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबते. पेरूमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट फ्री रॅडिकल्स हानिकारक कर्करोगाच्या पेशींना थांबवण्याचे काम करतात. पेरूच्या पानांचे तेल अनेक कर्करोगाच्या औषधांमध्ये देखील मिसळले जाते, ज्यामुळे कर्करोगाचा विकास चारपट वेगाने थांबतो.

वजन कमी करण्यात प्रभावी

पेरू हे वजन कमी करण्यासाठी अनुकूल अन्न मानले जाते. एका पेरूमध्ये 37 कॅलरीज आणि 12 टक्के फायबर असते. हा एक कमी कॅलरी स्नॅक आहे जो जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहे. फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पेरू पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com