Pradosh Vrat: महादेवाला प्रसन्न करण्यासाठी गुरु प्रदोषात 'या' गोष्टी करणे टाळा

प्रदोषाच्या दिवशी कोणत्या गोष्टी करु नये हे जाणून घेउया.
 lord shiva
lord shivaDainik Gomantak

Dont's On Guru Pradosh Vrat: या वर्षातील हे पहिले प्रदोष व्रत आहे. हे व्रत गुरुवारी आल्याने याला गुरु प्रदोष व्रत असं म्हणतात. हे व्रत भगवान शिवशंकराला समर्पित आहे. असे मानले जाते की हे व्रत केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

प्रदोष काल म्हणजे सूर्यास्ताची वेळ आणि रात्र होण्यापूर्वीच्या मधल्या वेळेला प्रदोष काल म्हणतात. म्हणजेच सूर्यास्तापूर्वी 45 मिनिटे आणि सूर्यास्तानंतर 45 मिनिटे यादरम्यानच्या वेळेला प्रदोष काल म्हणतात. प्रदोष व्रत वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.

प्रदोष तिथी सोमवारी येते तेव्हा त्याला सोम प्रदोष व्रत म्हणतात. भौम प्रदोष व्रत मंगळवारी येते आणि जेव्हा प्रदोष तिथी गुरुवारी येते तेव्हा ती तारीख गुरु प्रदोष व्रत म्हणून ओळखली जाते.

प्रदोषकाळात महादेवाची पूजा केली जाते. हे व्रत शिवशंकराची कृपा आपल्यावर सदैव राहावी यासाठी केले जाते. पण हे व्रत करत असताना काही गोष्टी अशा आहेत, ज्या या दिवशी करणे टाळले पाहिजे. अन्यथा भगवान शिवशंकराची कृपा आपल्यावर राहत नाही. प्रदोषाच्या दिवशी कोणत्या गोष्टी करु नये हे जाणून घेउया.

 lord shiva
Thursday Benefits: गुरुवारी गुळाचे करा 'हे' उपाय, प्रत्येक कामात मिळेल यश

दोषमध्ये या गोष्टी करु नये

 • प्रदोष व्रतात लाल मिरची, धान्य, तांदूळ आणि साधे मीठ खाऊ नये. तथापि, आपण पूर्ण उपवास किंवा फलाहार देखील करू शकता.

 • या दिवशी भांडणे टाळावीत.

 • ब्रह्मचर्य पाळावे.

 • अन्न ग्रहण करणे टाळावे.

 • व्रत करणाऱ्याने काळे कपडे घालू नयेत.

 • इतरांचे वाईट करणे टाळा.

 •  उशिरा उठू नये.

 • घरातील कोणत्याही सदस्याने मद्यपान करु नये.

 • घरी मांस शिजवू नये.

 •  घरात शांततापूर्ण वातावरण राखले पाहिजे.

प्रदोष व्रत हे असे व्रत आहे की ज्याने मनुष्य जीवनातील दोषांपासून मुक्त होतो. तसेच महादेवाची कृपा त्याच्यावर सदैव राहते.

महादेवाला खूश करण्यासाठी कोणत्या गोष्टी अर्पण कराव्या

 • भोलेनाथला तांदूळ अर्पण करावे. त्यामुळे लोकांच्या जीवनात धनाचा वर्षाव होतो आणि गरीबी दूर होते.

 • तुम्हांला तुमच्या आयुष्यातील पाप नष्ट करायचे असल्यास महादेवाला तीळ अर्पण करावे.

 • घर आणि जीवनात सुख समुद्धी आणण्यासाठी जवस अर्पण केले पाहिजे.

 • संतान प्राप्तीसाठी महादेवाला देवाला गहू अर्पण करावे.

 • महादेवाला प्रसाद अर्पण केल्यानंतर त्याचे गरीबांमध्ये वाटप करावे.

 • महादेवालाप्रसन्न करण्यासाठी डमरू वाजवावा.

 • ज्यांच्या घरात बरेच जण सारखे आजारी असतात त्यांनी शंकराला पाणी वाहावे.

 • भोग आणि मोक्ष प्राप्तीसाठी शंकराला गंगा जल अर्पण करावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com