Hair Style Hacks: चमकदार अन् स्ट्रेट केस हवे आहेत? मग, फॉलो या '4' करा सिंपल ट्रिक्स

Hair Style Hacks: स्ट्रेटनरचा वापर न करताही तुम्ही घरगुती पद्धतीने केसांना स्ट्रेट करू शकता.
Hair Style Hacks
Hair Style HacksDainik Gomantak

Hair Style Hacks: केस चमकदार आणि स्ट्रेट असावे असे अनेक महिलांना वाटते. यासाठी महिला अनेक महागडे प्रोडक्ट किंवा इलेक्ट्रिक वस्तुंचा (स्ट्रेटनर) वापर करतात. पण यामुळे केस गळण्याची समस्या जास्त वाढते. तसेच केसांची नैसर्गिक चमक देखील कमी होते.

पण तुम्ही काही घरगुती गोष्टींचा वापर करून केस चमकदार आणि स्ट्रेट करू शकता. यासाठी कोणत्या गोष्टींचा वापर करावा हे जाणून घेऊया.

Coconut Milk
Coconut MilkDainik Gomantak

1) कोकोनट मिल्क
कोकोनट मिल्कमध्ये अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. केस स्ट्रेट करण्यासाठी तुम्ही कोकोनट मिल्कचा वापर करू शकता. यासाठी एका भांड्यात कोकोनट मिल्क घ्यावे आणि त्यात 4-6 चमचे लिंबाचा रस मिक्स करावा.

सुमारे एक तास फ्रिजमध्ये ठेवावे. यानंतर हे पॅक केसांवर 15 मिनिटे लावून ठेवावे. एका तासानंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुतल्यानंतर केस कंगव्याने विचरावे. यामुळे केस स्ट्रेट तर होतीलच शिवाय चमकदार देखील होतील.

olive oil
olive oilDainik Gomantak

2) अंडी आणि ऑलिव्ह ऑइल

अंडी आणि ऑलिव्ह ऑइलचा वापर करून तुम्ही केस स्ट्रेट करू शकता. यासाठी एका भांड्यात पाच चमचे ऑलिव्ह ऑईल आणि दोन अंडी मिक्स करावे. नंतर केसांच्या मुळात हे मिश्रण लावावे. यानंतर एक टॉवेल घ्यावा.

तो कोमट पाण्यात बुडवावा. नंतर तो पिळून घ्यावा आणि केसांना बांधावा. काही वेळा नंतर केस शॅम्पूने स्वच्छ धुवावे आणि पुन्हा जाड कंगव्याने केस विचरावे. असे केल्याने केस स्ट्रेट होतात.

Hair Style Hacks
AirPods स्वच्छ करण्यासाठी वापरा 'या' घरगुती ट्रिक्स
Hot Oil
Hot OilDainik Gomantak

3) हॉट ऑइल ट्रीटमेंट

दररोज केसांना कोमट तेल लावल्याने केस लवकर स्ट्रेट होतात. तसेच त्यांच्यामध्ये ओलावाही कायम राहतो. तुम्ही खोबरेल तेल, ऑलिव्ह तेल किंवा बदामाचे तेल वापरू शकता. यासाठी कोणतेही तेल कोमट करावे. नंतर केसांना लावून 15 ते 20 मिनिटे मसाज करावी.

नंतर केसांना कंगव्याने विचारावे. नंतर कोमट पाण्यात टॉवेल बुडवून केसांना बांधावे. घरगुती स्टीम ट्रीटमेंटने केसांच्या मुळांपर्यंत तेल पोहोचते. अर्ध्या तासानंतर केस शॅम्पूने स्वच्छ धुवावे. यामुळे केस स्ट्रेट होतील.

Aloe Gel
Aloe GelDainik Gomantak

4) कोरफड जेल

कोरफडचा वापर करून तुम्ही केस स्ट्रेट करू शकता. तसेच केसांची चमक देखील वाढते. यासाठी अर्धाकप कोरफड जेल आणि ऑलिव्ह ऑईल मिक्स करावे. या मिश्रणाने केसांच्या मुळात मसाज करावी.

नंतर कोमट पाण्यात टॉवेल बुडवून केसांना बांधावे. नंतर शॅम्पुने केस स्वच्छ धुवावे.  यानंतर केस थोडे ओले असतानाच कंगव्याने विचरावे. यामुळे केस स्ट्रेट आणि चनकदार होतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com