Hair Care Tips: मुलायम केसांसाठी मिनिटांमध्ये घरीच बनवा Hair Gel

हेयर जेलमधील (Hair Gel) घटक नैसर्गिक असल्याने केसांना (Hair) कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.
Hair Care Tips: मुलायम केसांसाठी मिनिटांमध्ये घरीच बनवा Hair Gel
मुलायम केसांसाठी मिनिटांमध्ये घरीच बनवा Hair Gel Dainik Gomantak

केसांना अनेक वेळा शॅम्पू (Shampoo) केल्यानंतरही ते कोरडेच (Dry) दिसतात. अशा वेळी केसांची (hair) गुंता सोडवणे कठीण होते. तसेच केस निर्जीव आणि कोरडे (Dry) पडतात. तज्ञांच्या मते केसांना शॅम्पू (Shampoo) केल्यानंतर जेल (Gel) लावावे. यामुळे केसांमधील गुंता कमी होतो. केस सील्की (Silky) आणि चमकदार (Shiny) होण्यास मदत मिळते. बाजारात (Market) सुद्धा अनेक हेयर सिरम (Hair serum) मिळतात. परंतु त्याच्यातील रसायनामुळे केस (Hair) खराब होण्याची शक्यता असते. यामुळे घरीच हेयर जेल (Hair gel) बनवण्याची पद्धत जाणून घेऊया.

* साहित्य

गुलाब जल - 4 ते 4 चमचे

कोरफड जेल -1 मोठा चमचा

व्हिटॅमिन ई कॅप्सूल - 1 किंवा 1 चमचा बदाम तेल

स्प्रे बाटली - 1

* कृती

* सर्वातआधी एक भांड्यात गुलाबजल आणि कोरफड जेल मिक्स करावे.

* याचे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे.

* नंतर या मिश्रणात व्हिटॅमिन ई कॅप्सूल तेल किंवा बदाम तेल मिक्स करावे.

* तयार आहे तुमचे घरगुती हेयर जेल.

* हे जेल स्प्रे बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावे.

* हे जेल तुम्ही सहजपणे 10 ते 15 दिवस वापरू शकता.

* हेयर जेल लावण्याची पद्धत

* केसांना जेल लावण्यापूर्वी केस चांगले धुवावे.

* जेल लावण्यापूर्वी स्प्रे बॉटल चांगली हलवून घ्यावी.

* यानंतर हलक्या हाताने केसांना जेल लावावे.

* हेयर जेल केसांच्या मुळांमध्ये लावण्याची गरज नाही.

* बाहेर जातांना तुम्ही केसांना जेल लावू शकता. यासाठी फक्त केस थोडे ओले असणे आवश्यक आहे.

* हेयर जेल लावण्याचे फायदे

* हेयर जेलमधील घटक नैसर्गिक असल्याने केसांना कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.

* कोरड्या आणि निर्जीव केसांना पोषण मिळते.

* केसांची होणारी गुंतागुंत कमी होते.

* केसांमधील कोरडेपणा कमी होऊन केस सील्की आणि चमकदार होतात.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com