Hair Care Tips : केसांचे गळणे कमी करण्यासाठी वापरा फळांचा हेअर मास्क

किवी हे फळ (Kiwi ) फक्त आपल्या आरोग्यासाठीच (Health) फायद्याचे नसून आपल्या केसांच्या (Hair) आरोग्यासाठी देखील फायद्याचे आहे.
Hair Care Tips : केसांचे गळणे कमी करण्यासाठी वापरा फळांचा हेअर मास्क
केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे.

तुमचे वय काहीही असो केस गळने (Hair loss) ही एक चिंतेचा विषय आहे. यामुळे केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आपण काही उपाय करू शकतो. आपण फ्रूट हेअर पॅक (Fruit Hair Pack) वापरुन पाहू शकता. केसांवर फळ लावणे हे थोडे विचित्र वाटेल. परंतु केस गळने कमी होऊ शकते. जाणून घेऊया फळांपासून हेअर पॅक कसे बनवतात.

 केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे.
Skin Care Tips : पावसाळ्यात त्वचा चमकदार ठेवण्यासाठी करा 'हे' चार उपाय

किवीचे हेअर पॅक :

किवी हे फळ फक्त आपल्या आरोग्यासाठीच फायद्याचे नसून आपल्या केसांच्या आरोग्यासाठी देखील फायद्याचे आहे. यामुळे आपल्या टाळुचे पोषण होण्यास मदत मिळते . यामुळे केस गळणे (Hair loss) कमी होते. हा हेअर पॅक बनवण्यासाठी तुम्हाला 2 चमचे किवीचा खिस , 1 चमचा ऑलिव्ह ऑईल, 1 चमचा कांद्याचा रस घ्यावा. मोठ्या भांड्यात यांचे मिश्रण चांगले एकत्र करून घ्यावे. हे मिश्रण केसांमध्ये पूर्णपणे लावावे. हे मिश्रण 15-20 लाऊन ठेवावे. नंतर केसांना शॅम्पू लावून स्वच्छ धुवावे.

 केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे.
Skin Care Tips : हातावरील टॅनिंग कमी करायची असेल तर ...

आंब्याचे हेअर पॅक :

आंब्यात जीवनसत्त्वे ,प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. यामुळे केसांचे गळणे कमी होण्यास मदत मिळते. तसेच केस निरोगी राहतात. याचे हेअर पॅक तयार करण्यासाठी 1 आंबा , 1 अंडे , 2 ते 3 चमचा दही घ्यावे. हे पॅक तयार करण्यासाठी पहिले आंब्याची पेस्ट तयार करावी,नंतर त्यात दही आणि अंड्यातील पिवळे बलक मिक्स करावे. हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे. नंतर हे पॅक केसांच्या मुळात चांगल्या पद्धतीने लावावे. 15 ते 20 मिनिट हे पॅक केसांमध्ये राहू द्या. नंतर केस शॅम्पू लावून चांगले धुवावे. यामुळे केसांचे गळणे (Hair loss) कमी होण्यास मदत मिळते. तसेच केस मुलायम होतात.

 केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे.
Monsoon Health Care : वजन कमी करण्यासाठी घ्या 'असा' आहार

पपई आणि ऑलिव्ह ऑईल हेअर पॅक :

पपई आणि मध हे केसांच्या आरोग्यासाठी फायद्याचे आहे. यामुळे डोक शांत राहते. ऑलिव्ह ऑईल केसांच्या मुळा मजबूत ठेवण्यास मदत करते. तसेच केसांची वाढ होण्यास उपयुक्त आहे. याचे हेअर पॅक तयार करण्यासाठी अर्धा कप ऑलिव्ह ऑईल, 1 पिकलेली पपई आणि 2 चमचे मध घ्यावे. याचे पॅक तयार करतांना पहिले पपई ची पेस्ट तयार करावी. नंतर त्यात ऑलिव्ह ऑईल व मध चांगले मिक्स करावे. हे मिश्रण संपूर्ण केसात आणि केसांच्या मुळात लावावे. हे मिश्रण 20 मिनिटे केसांत ठेवा. नंतर कोमट किंवा थंड पाण्याने शॅम्पू लाऊन केस चांगले धुवावे. यामुळे केसांचे गळणे कमी (Hair loss) होण्यास मदत मिळते. तसेच केस मुलायम आणि दाट होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com