लांब आणि चमकदार केसांसाठी फक्त 5 मिनिटे करा 'हे' काम

लांब आणि चमकदार केसांसाठी तुम्ही अनेक उपाय करत असाल.
लांब आणि चमकदार केसांसाठी फक्त 5 मिनिटे करा 'हे' काम
Hair Care TipsDainik Gomantak

सर्वांना केस मजबूत आणि सुंदर असावे, असे कोणाला वाटत नाही. महिला असो वा मग पुरुष प्रत्येक जण केसांची खूप काळजी घेण्याचा प्रयत्न करतात. अनेकांना केस गळण्याची समस्या जाणवते. केस लांब आणि चमकदार होण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करत असतो. उन्हाळ्यामध्ये केसांची अधिक काळजी घ्यावी लागते. कारण उन्हामुळे घाम येऊन केस चिकट आणि खराब होतात. तसेच केस गळण्याची समस्या निर्माण होऊ शकते. (Summer hair Care tips)

* केसांबद्दल असलेल्या महत्त्वाच्या बाबी
सामान्यपणे निरोगी व्यक्तीचे एका दिवसात 70 ते 100 केस गळतात. हे नॉर्मल आहे. त्यामुळे केस गळण्याची भीती तुमच्या मनात असेल टि काढून टाका.पण जर तुम्ही तुमच्या केसांमध्ये हात घालताच जर केस तुमच्या गळत असतील तर याकडे लवकरच लक्ष देण्याची गरज आहे. याचाच अर्थ असा की तुम्हांला तुमच्या केसांना (Hair) पोषण देण्याची आणि अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

* फक्त 5 मिनिटे करा 'हे' काम
कोरफडचा वापर

केसांची चमक टिकून राहण्यासाठी नियमितपणे कोरफड जेलने केसांच्या मुळात मसाज करावी. असे नियमितपणे केल्याने केसांचे आरोग्य चांगले राहते.

Hair Care Tips
Mint Leaves: उष्माघातावर 'पुदिना' रामबाण उपाय

* असा करा वापर
रात्री झोपण्यापूर्वी केसांना एलोवेरा जेल लावू शकता. किंवा सकाळी हे आंघोळीच्या 20 मिनिटे आधी कोरफडीचे जेल केसांमध्ये मसाज करावी आणि नंतर शॅम्पू करावा. जर तुमचे केस खूपच रफ असतील तर तुम्ही हे जेल शॅम्पूनंतर केसांना कंडिशनर म्हणून देखील वापरू शकता. शॅम्पू केल्यानंतर, हे जेल केसांना लावा आणि नंतर दोन मिनिटांनी केस स्वच्छ पाण्याने धुवावे. यामुळे तुमच्या केसांना नैसर्गिक चमक मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.