Hair Fall Treatment: थंडीच्या दिवसात केसांच्या समस्या वाढल्या? मग हे उपाय कराच!

थंडी पडायला लागली की केस कोरडे होणे, गळणे, चाई पडणे, भेगा पडणे असे विकार व्हायला सुरुवात होते.
Hair Fall Treatment
Hair Fall TreatmentDainik Gomantak

थंडी पडायला लागली की केस कोरडे होणे, गळणे, चाई पडणे, तसंच त्वचेवर ओरखडे उमटणे, त्वचा काळवंडणे, पापुद्रे सुटणे, भेगा पडणे असे विकार व्हायला सुरुवात होते. या विकारांकडे दुर्लक्ष झालं तर ते गंभीर स्वरूप धारण करू शकतात. टक्कल पडू शकतं किंवा त्वचा निस्तेज दिसायला लागते. म्हणूनच या दिवसांत केसांची काळजी घेणं आवश्‍यक आहे.

केसांची काळजी

आठवड्यातून एकदा तरी केसांना डीप कंडिशननिंग करा. यामुळे केसांना मॉइश्‍चर मिळेल. तसंच शॅम्पू केल्यावर केस अतिशय कोरडे होतात. ( winter hair care tips in marathi ) त्यामुळे शॅम्पू केल्यावर केसांना तेल लावावं. म्हणजे त्यांना पोषण मिळेल आणि ते मऊ आणि चमकदार दिसतील.

तेल कोणते वापराल?

हल्ली केस गळण्याच्या समस्या खूप ऐकायला मिळतात. विशेषत: केस धुताना केस अधिक गळतात. थंडीच्या दिवसात तर ही समस्या अतिशय कॉमन झाली आहेत. केस गळतीमागे विविध कारणं असू शकतात. त्यात आपली बदलती जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या सवयी यामुळे केस अधिक गळतात. आपल्याकडे अशी काही नैसर्गिक तेलांचे प्रकार आहेत जी नियमित लावली तर आपल्या केसांचं आरोग्य सुधारेल.

खोबरेल तेल-

खोबरेल तेल घेऊन त्याने केसांच्या मुळाशी बोटांच्या साहाय्याने मसाज करा. यामुळे खराब झालेले केस किंवा दुभंगलेले केस व्यवस्थित करण्यास मदत करतात. तेल गरम करून टाळूवर लावल्यावर तिथलं रक्ताभिसरण सुरळीत होतं आणि केसांना आवश्‍यक असलेला ऑक्‍सिजन त्यातून मिळतो. साहजिकच केसांचं आरोग्य सुधारतं.

एरंड तेल-

एरंड तेल असं तेल आहे जे तुमच्या केसांच्या प्रत्येक समस्येवरील रामबाण उपाय आहे. दररोज केसांच्या मुळाशी लावल्याने रक्ताभिसरण सुरळीत होतं आणि नैसर्गिकरीत्या केसांना ऑक्‍सिजन पुरवला जातो. परिणामी केस वाढतात. त्यात जीवनसत्त्व ई आणि ओमेगा 6 नावाचं ऍसिड असल्याने केसांना त्यामुळे मॉइश्‍चर मिळतं. आणि दुभंगण्यापासून बचाव होतो.

Hair Fall Treatment
Diet Tips: फळांचे अतिसेवन ठरु शकते अनेक आजारांचे कारण

कोरफड आणि खोबरेल तेल-

कोरफडीत अँटीबॅक्‍टिरिअल आणि अँटीफंगलचे गुण असतात. ( winter hair care tips in marathi ) ज्यामुळे कोंडयापासून बचाव होण्यास मदत होते. म्हणूनच कोरफडीचं गर खोबरेल तेलात घालून ठेवावा. असं हे मिक्‍स केलेलं तेल टाळूला लावून ठेवावं. अर्ध्या तासानंतर धुऊन टाकावं म्हणजे चाईचा त्रास होत नाही आणि रक्ताभिसरणही सुरळीत होतं.

Hair Fall Treatment
Winter Soup : थंडीच्या दिवसात ‘हे’ सूप ठेवेल तुमचे आरोग्य उत्तम

आवळा आणि खोबरेल तेल-

आवळा हे केसांचं टॉनिक असून केसांच्या आरोग्यासाठी हे उत्तम आहे. आवळ्याची पूड खोबरेल तेलात घालून केसांच्या मुळांशी लावल्याने मुळं मजबूत होतात आणि केसांची वाढ होते. केसांत कोंडा होणे आणि अकाली केस पांढरे होण्यापासून बचाव होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com