Easter Sunday 2022|इस्टर संडे साजरा करण्याचे महत्व

इस्टर सणानिमित्त ख्रिश्चन धर्माचे लोक अंडी सजवतात आणि एकमेकांना भेट म्हणून देतात
Easter Sunday 2022
Easter Sunday 2022Dainik Gomantak

गुड फ्रायडेनंतर तिसऱ्या दिवशी इस्टर हा सण साजरा केला जातो. ख्रिस्ती धर्माचे लोक येशू ख्रिस्ताच्या पुनर्जन्माच्या आनंदात हा सण साजरा करतात. गुड फ्रायडेच्या तिसर्‍या दिवशी प्रभू येशूचे पुनरुत्थान झाल्याची श्रद्धा आहे. हा सण 'इस्टर संडे' (Easter Sunday) म्हणून ओळखला जातो. ख्रिसमसनंतर इस्टर हा ख्रिश्चन समुदायाचा सर्वात मोठा सण आहे. हे दोन्ही सण (Festival) येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरे केले जातात. दरवर्षी 17 एप्रिल हा दिन इस्टर साजरा केला जातो.चला तर मग या निमित्याने जाणून घेऊया या सणाचे महत्व काय आहे.

* इस्टर 40 दिवस साजरा केला जातो
बायबलनुसार, हजारो वर्षांपूर्वी गुड फ्रायडेच्या (Good Friday) दिवशी, जेरुसलेमच्या टेकड्यांवर येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यात आले होते. यानंतर, गुड फ्रायडेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच पहिल्या रविवारी, येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाले. पुनर्जन्मानंतर, येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसोबत सुमारे 40 दिवस राहिले. त्यानंतर त्यांना स्वर्ग प्राप्ती झाली. म्हणूनच इस्टर पूर्ण 40 दिवस साजरा केला जातो. परंतु अधिकृतपणे इस्टर उत्सव 50 दिवस चालतो. ख्रिश्चन धर्मीय लोक हा सण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहाने साजरा करतात.

Easter Sunday 2022
होईल झटपट वजन कमी, धने-बडीशेप आणि जिरे मिसळून बनवा डिटॉक्स वॉटर

* इस्टर कसा साजरा केला जातो?

या काळात ख्रिश्चन धर्मीय लोक प्रार्थना आणि उपवास करतात. इस्टर सणानिमित्त सर्व चर्च सुंदर पद्धतीने सजवल्या जातात. या दिवशी चर्चमध्ये मेणबत्त्या पेटवल्या जातात. ख्रिश्चन धर्माचे बरेच लोक या दिवशी मेणबत्त्या लावून घर सजवतात. इस्टरच्या दिवशी बायबलचे पठण केले जाते.

* अंडी भेट म्हणून का दिली जातात?
इस्टरच्या (Easter Day) दिवशी अंड्याला खूप महत्त्व दिले गेले आहे. इस्टर सणानिमित्त ख्रिश्चन धर्माचे लोक अंडी सजवतात आणि एकमेकांना भेट म्हणून देतात. त्या लोकांचे असे मनाने आहे कि अंडी चांगल्या दिवसांची सुरुवात आणि नवीन जीवनाचा संदेश देतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com