रेल्वे सुरक्षा दलातील अधिकाऱ्याची कर्तव्य कठोरता आणि ऊर्जा पाहून सर्वांचे मन हेलावले

Pib
शनिवार, 6 जून 2020

आपल्यातील माणुसकीचे दर्शन देत धैर्याने हवालदार यादव गाडीच्या मागे धावत गेले आणि त्यांनी गाडीतील मातेला गाठून  दुधाची पिशवी तिच्या मुलासाठी तिच्याकडे दिली.

मुंबई
रेल्वे तसेच  आणि वाणिज्य  आणि उद्योगमंत्री श्री. पियुष गोयल यांनी रेल्वे सुरक्षा दलातील अधिकारी इंदर सिंग यादव यांनी केलेल्या प्रशंसनीय कामाची दखल घेत यादव यांच्या सत्कारार्थ  रोख रकमेचे पारितोषिकही जाहीर केले.यादव यांनी एका चार महिन्याच्या मुलाच्या दुधाची सोय करण्याकरीता रेल्वेगाडी मागे धावत जाऊन आपल्या कृत्याने सर्वांपुढे एक आदर्श घालून दिला आहे.      

श्रीम.शरीफ हश्मी आणि त्यांचे पती श्री हसीन हश्मी हे आपल्या चार महिन्याच्या बालकासह श्रमिक स्पेशल गाडीतून बेळगाव ते गोरखपूर असा प्रवास करत होते.त्यांचे मूल दुधासाठी रडत होते परंतु त्यांना आधीच्या कोणत्याही स्थानकावर दूध मिळू शकले नाही,भोपाळ स्थानकावर त्यांनी हवालदार यादव यांची मदत मागितली.श्री.इंदर सिंग यादव यांनी त्वरीत धावत जाऊन भोपाळ रेल्वेस्थानकाबाहेरील दुकानातून दूध आणले परंतु तोवर गाडी सुटली होती.

संबंधित बातम्या