तुम्ही रोज मायक्रोवेव्ह वापरता? आधी जाणून घ्या त्याचे अपायकारक परिणाम

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 मार्च 2021

बर्‍याच संशोधनात असे दिसून आले आहे की मायक्रोवेव्ह ओव्हनचा नियमित वापर प्रतिकारशक्ती कमकुवत करू शकतो. इतकेच नाही तर जर गर्भवती महिलेने त्यामध्ये बनवलेल्या पदार्थांचा जास्त वापर केला तर मुलाच्या जन्मावेळी समस्या उद्भवू शकतात.

प्रत्येकाला गरम-गरम जेवायला आवडतं. अशा परिस्थितीत प्रत्येक घरात मायक्रोवेव्ह असणं ही सामान्य गोष्ट झाली आहे. यामुळे आपण शक्य तितक्या लवकर अन्न शिजवू शकतो, गरम करू शकतो. इतकेच नाही तर घरात सिनेमा पाहताना पटकन् पॉपकॉर्न बनवून त्याचा आनंदही घेऊ शकतो. परंतु  मायक्रोवेव्ह ओव्हनचे जितके फायदे आहेत, तितकेच नुकसानदेखील आहे. त्यामुळे काही देशांनी येथे त्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

आरोग्यासाठी हानिकारक

बर्‍याच संशोधनात असे दिसून आले आहे की मायक्रोवेव्ह ओव्हनचा नियमित वापर प्रतिकारशक्ती कमकुवत करू शकतो. इतकेच नाही तर जर गर्भवती महिलेने त्यामध्ये बनवलेल्या पदार्थांचा जास्त वापर केला तर मुलाच्या जन्मावेळी समस्या उद्भवू शकतात. याव्यतिरिक्त मायक्रोवेव्हचा वारंवार वापर केल्याने कर्करोगाचा धोकाही वाढतो. जर एखादी व्यक्ती बराच काळ मायक्रोवेव्ह वापरत असेल तर तो सहजपणे व्हायरल आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाच्या संपर्कात येऊ शकतो. उच्च रक्तदाबाचीदेखील भिती यामुळे वाढते. 

मायक्रोवेव्हच्या वापराचे अनेक तोटे आहेत, परंतु काही गोष्टी विचारात घेतल्यानंतर जर आपण त्याचा वापर केला तर आपण या समस्या टाळू शकतो. यासाठी आपण त्यासंबंधित अत्यावश्यक बाबी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. आपल्या घरात गर्भवती महिला किंवा मुले असल्यास, स्वयंपाकासाठी त्याचा वापर करू नका. आपण मायक्रोवेव्हमध्ये काही बनवत असल्यास, त्यांना अधूनमधून ढवळत रहा. कधीही एकापेक्षा जास्त वेळा अन्न गरम करू नका. हे अन्न जितक्या वेळा मायक्रोवेव्हमध्ये गरम केले जाईल तितकेच अन्न जास्त अपायकारक होईल. मायक्रोवेव्हमध्ये चहा, कॉफी किंवा कोणत्याही प्रकारचे पेय गरम करू नका.

त्याचा कसा परिणाम होतो

वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार मायक्रोवेव्ह ओव्हनमध्येन अन्न ज्यामुळे गरम होते, त्या किरणोत्सर्गांमुळे अन्नाची जैविक आणि जैवरासायनिक रचना खराब होते. अचानक उष्णतेचा अन्नावर विपरित परिणाम होतो. 

संबंधित बातम्या