Hartalika 2021: जाणून घ्या पूजेचे महत्व

हा व्रत कुमारिकांनी केल्यास मनासारखं जोडीदार मिळतो, असे म्हंटल्या जाते
Hartalika 2021: जाणून घ्या पूजेचे महत्व
Hartalik: जाणून घ्या पूजेचे महत्व Dainik Gomantak

देशात अनेक भागातील महिला हरतालिका व्रत करतात. हे व्रत विवाहित महिला आणि मुलीसुद्धा करतात. हरतालिका तृतीया दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात साजरी करतात. अनेक महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हरतालिकेचे व्रत करतात. हरतालिकेचा उपवास कडक असल्याने सर्वांत कठीण उपवास मानला जातो. उद्या देशभरात हरतालिका साजरी केली जाणार आहे. हा व्रत कुमारिकांनी केल्यास मनासारखा जोडीदार मिळतो, असे म्हंटल्या जाते.

* हरतालिकेच्या पूजेची वेळ

देशभरात उद्या हरतालिका साजरी केली जाणार आहे. हरतालिकेच्या पूजेसाठी चांगला मुहूर्त सकाळी 6 वाजून 3 मिनिटापासून तर सकाळी 8 वाजून 33 मिनिटांपर्यंत चांगला मुहूर्त आहे. प्रदोष काल हरतालिका व्रत पूजा मुहूर्त संध्याकाळी 6 वाजून 33 मिनिटांनी ते रात्री 8 वाजून 51 मिनिटांपर्यंत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी महादेवाच्या मातीच्या पिंडाच विसर्जन करून महिला व्रत सोडतात.

Hartalik: जाणून घ्या पूजेचे महत्व
Ganesh Festival 2021: गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करताना या गोष्टींची घ्या काळजी

* महिलांनी ही काळजी घ्यावी

* हरतालिका व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी चिडचिड करू नये.

* मनात कोणत्याही प्रकारचा राग ठेवू नये.

*या दिवशी महिला रात्रभर जागरण करून आराधना करतात.

* या दिवशी फक्त फळ खावीत

* महादेवाची आराधना करावी .

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com