Side Effects of Basil: तुळशीचे असेही आहेत दुष्परिणाम

Basil plants
Basil plants

Dainik Gomantak

तुळशीच्या (Basil plants) रोपाचे अनेक फायदे आहेत. तुळस ही प्रत्येकाच्या घरात असतेच. तुळशीमध्ये खूप सारे औषधी (Medicine) गुण असतात. त्यामुळे तुळसीला आयुर्वेदात (Ayurveda) खूप महत्व प्राप्त झाले आहे. सर्दी, खोकला, मलेरिया, मासिक पाळीचा त्रास आणि असे इतर अनेक आजारपासून सुटका होण्यास मदत होते. पण तुळस कशी खायला पाहिजे हे सुद्धा आयुर्वेदात सांगितले. (Have you read the side effects of Tulsi?)

Basil plants
Health Tips:अंडी उकडून खावी की कच्ची?

तुळशीचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते. तसेच पचनशक्ती चांगली होते आणि प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. अनेकजण तुळशीची पाने चावून खात असतात. परंतु , असे केल्याने त्यांच्या दातांना नुकसान होऊ शकते. तुलशीची पाने चावून खल्यास काय काय नुकसान होतात आणि तुळशीच्या पानांचा कस सेवन कराव याबद्दलच अधिक माहिती जाणून घेऊया.


तुळशीच्या पानांचे काय नुकसान

तुळशीच्या पानांचे अनेक फायदे आहेत. त्यांची पाने अनेक आजार पासूनदूर ठेवते. चेहऱ्यावरील मुरूम कमी होते. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवते.  बरेचजन ही पाने चावून खातात. परंतु असे करणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. तुळशीच्या पानांनमध्ये जास्त प्रमाणात पारा (Mercury) आणि लोह (Iron) असते. तसेच अर्सेनिकच प्रमाण देखील थोड्या प्रमाणात असते. तुळशीचे पान जेव्हा चावून खातो, तेव्हा या सर्व पदार्थांचा संपर्क प्रत्येकक्षात दातांशी येतो. यामुळे  दातांचे नुकसान होऊ शकते. दात खराब होऊ शकतात किंवा दातांसंबंधित अनेक आजार निर्माण होऊ शकतात. त्यामुळेच तुळशी पाने चावून खाणे टाळावी. मग आता तुळशीच्या पानांचे  सेवन कसे करायचे ते जाणून घेऊया.

Basil plants
Beauty Tips - चेहऱ्यावरील सुरकुत्यासाठी फायदेशीर आहे अंड्याचा फेसपॅक 

अशा पद्धतीने खावी तुळशीची पाने

  • तुळशीची पाने बारीक करून चहात टाकून घेऊ शकता.

  • तुळशीची पाने पाण्यात उकळून घ्या.  ते पाणी प्यावे. 

  • फक्त तुळशीची पाने बारीक करून पाण्यात टाकून ते पाणी प्यावे. 

  • तुळशीची पाने उन्हात वाळवून घ्यावी. नंतर त्याची पावडर करून ते पाणी प्यावे.    

  • या गुणकारी तुळशीच्या पानांचे सेवन करताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवाव्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com