Health Tips: उन्हाळ्यात आरोग्यासाठी उपयुक्त; पपई खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

Health Tips: उन्हाळ्यात आरोग्यासाठी उपयुक्त; पपई खाण्याचे आश्चर्यकारक फायदे
Health Tips Papaya is considered a superfood in summer

Health Benefits Of Papaya पपई ला उन्हाळ्यातील सुपरफूड मानले जाते. पपई हे एक  आरोग्यदायी फळ आहे. हे अँटीऑक्सिडेंट्सने भरलेले आहे जे जळजळ कमी करू शकते आणि बर्‍याच रोगांशी लढू शकते. तसेच हे आपल्याला तरुण दिसण्यात देखील मदत करू शकते. पपई  खाल्ल्याने ह्रदयरोग, मधुमेह, कर्करोग, आणि पचनशक्ती सुधारण्यास मदत होते, रक्तातील शुगर लेवल नियंत्रित करणे, रक्तदाब कमी करणे आणि कॅलरी कमी करण्यासाठी उत्तम फळ म्हणून पपई  मुख्य़ स्रोत मानला जातो. पपई वजन कमी करण्यास आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करू शकते. पौष्टिक पपईचे फायदे बरेच आहेत, त्यापैकी काही आपण जाणून घेवूया.

1. डोळ्यासाठी उपयूक्त
पपईमध्ये दमा प्रतिबंधक आणि कॅन्सरविरोधी गुणधर्मांचा समावेश आहे. पपईमध्ये आढळणारा झेक्सॅन्थिन, हानिकारक निळ्या प्रकाश किरणांना फिल्टर करते. डोळ्याच्या आरोग्यासाठी संरक्षणात्मक झेक्सॅन्थिन घटक उपयुक्त ठरते. 

2. दम्यासाठी उपयुक्त
जे लोकं पोषक द्रव्ये जास्त प्रमाणात खातात त्यांच्यामध्ये दम्याचा आजार होण्याचा धोका कमी असतो. यापैकी एक पोषक त्वत म्हणजे बीटा कॅरोटीन, जे पपई, जर्दाळू, ब्रोकोली, कॅन्टॅलोप, भोपळा आणि गाजर यासारख्या फळांमध्ये आढळतो.

3.कर्करोगविरोधी गुणधर्मांनी समृद्ध
पपईमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट बीटा कॅरोटीन सेवन केल्यास कर्करोगाचा धोका कमी असतो. कर्करोग एपिडेमिओलॉजी अँड प्रिव्हेंशन बायोमार्कर या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, तरुण वर्गामध्ये, बीटा कॅरोटीनयुक्त प्रोस्टेट कर्करोगाविरूद्ध संरक्षणात्मक भूमिका बजावते.

4. मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर
अभ्यासानुसार असे दर्शविले गेले आहे की टाइप 1 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये जे उच्च फायबर डाइट घेतात त्यांचे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते आणि टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखर, लिपिड आणि इन्सुलिनची पातळी सुधारली जाऊ शकते.

6. पचनशक्तीत वाढ
पपईमध्ये पपाइन नावाचा एक एंजाइम घटक असतो जो पचनशक्ती वाढविण्यास मदत करतो. पपईमध्ये फायबर आणि पाण्याचे प्रमाणही जास्त असते, या दोन्ही घटकांचा बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते. आणि निरोगी पचनशक्ती वाढविण्यास उपयुक्त ठरते.

7.त्वचेसाठी फायदेशीर
जखमा बरे करण्यास त्याचबरोबर जळलेल्या भागाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी मॅश केलेली पपई फायदेशीर आहे. संशोधकांचा असा विश्वास आहे की पपईतील प्रोयोलॅटिक एंझाइम स्योपोपन आणि पपीन हे घटक या जखमा ठीक करण्यास मदत करते.

8. केसांची समस्या दूर करते
पपई हे केसांसाठीदेखील एक चांगले फळ आहे कारण त्यात विटामिन ए हा घटक असतो. हा घटक केसांना मॉइश्चराइझ करतो. त्वचा आणि केसांसह सर्व शारीरिक पेशींच्या वाढीसाठी पपई खाणे फायद्याचे आहेत. कोलेजेन तयार करण्यासाठी व्हिटॅमिन सीचे पुरेसे सेवन करणे गरजेचे आहे, जे पपईमध्ये आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com