पपई अन् लिंबू एकत्र खातायं? मग 'हे' Side Effect जाणून घ्या

पपईचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम असतो, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते चांगले मानले जाते. पण काही गोष्टींसोबत खाल्ल्यास ते विषासारखेही काम करू शकते.
Side Effect eating  papaya lemon
Side Effect eating papaya lemon Dainik Gomantak

Side Effect of Eating papaya lemon: अनेक लोक अनेक पदार्थ एकत्र करुन खातात. पण असे करणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते. कारण काही पदार्थ एकत्र खाल्याने आरोग्यावर विपरित परिणाम होतो.

असेच एक फळ म्हणजे पपई आहे. जे पोटांच्या समस्यासाठी फायदेशीर असते. वजन कमी करण्यापासून ते पचनशक्ती सुधारण्यापर्यंत पपई अनेक गोष्टींसाठी फायदेशीर ठरते.

पपईमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. त्यामुळे ते आणखी फायदेशीर ठरते. पण पपईसोबत काही गोष्टी खाणे विषारी ठरू शकते.

  • पपई खाण्याचे फायदे

पपईमध्ये आहारातील (Diet) फायबर, चरबी, प्रथिने, कार्बोहायड्रेट, जीवनसत्त्वे सी, ए, ई, बी, खनिजे आणि अल्फा आणि बीटा-कॅरोटीन यांसारखे अँटीऑक्सिडंट असतात. एवढेच नाही तर ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारखे पोषक घटक देखील यामध्ये आढळतात. 

पपई शरीरातील पेशी पुन्हा निर्माण करण्यास मदत करतात. त्याच वेळी ते ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यासाठी कार्य करतात. आरोग्य तज्ञ रोज पपई खाण्याचा सल्ला देतात. 

हे फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. तसेच जखमा भरण्यास मदत करते. पण काही गोष्टींसोबत पपई चुकूनही खाऊ नका.

  • पपई-लिंबू एकत्र खाऊ नका

पपई आणि लिंबू कधीही एकत्र खाऊ नका. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. पपईमध्ये लिंबाचा रस मिक्स केल्याने हानिकारक ठरु शकते. यामुळे अशक्तपणा आणि हिमोग्लोबिन कमी होऊ शकते. हे सर्व वयोगटातील लोकांसाठी धोकादायक असू शकते. म्हणूनच पपई-लिंबू एकत्र खाऊ नका.

  •  पपई खातांना कोणती काळजी घ्यावी

शरीराला पुरेसे पोषण द्यायचे असेल तर एक वाटी पपई खाणे पुरेसे समजले जाते. 

पण यापेक्षा जास्त खाणे देखील हानिकारक ठरू शकते.

पपईमध्ये पपेन नावाचे एन्झाइम आढळते. ज्यामुळे ऍलर्जी, सूज, चक्कर येणे, डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com