Health Tips: वजन आणि मधुमेह कमी करण्यासाठी हिवाळ्यातील 'हे' फळ आहे फायदेशीर

पेरूच्या फळात अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात.
Health Tips
Health TipsDainik Gomantak

Health Benefits Of Guava: आहारात हंगामी फळांचा समावेश करावा असा सल्ला नेहमीच दिला जातो. हिवाळ्यात देखील अशी अनेक फळे आहेत, जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे. पेरू या फळाचे सेवन अनेक गंभीर आरोग्य समस्यांचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पेरूच्या फळात अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. याचा मधुमेहाची समस्या आणि त्यासंबधित जोखीम कमी करण्यास मदत करतात.

Health Tips
Goa Job Fair: 500 युवकांना मिळाला रोजगार, 4,800 जण शॉर्टलिस्ट

पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील कमी असतो, त्यामुळे मधुमेहींनाही याचे सेवन केल्याने फायदे मिळू शकतात. आहारतज्ञांच्या मते, पेरू हे अशा फळांपैकी एक आहे ज्याच्या पानांचा वापर विविध घरगुती उपचारांसाठी केला जातो. या फळामध्ये आढळणारे पोषक घटक शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात, ज्यामुळे अनेक आजारांपासून संरक्षण मिळते.

मधुमेहींसाठी फायदेशीर

रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी पेरूचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. साल काढलेले पेरू रक्तातील साखर तसेच कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स आणि लिपिड प्रोफाइल कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. पेरूच्या पानांचा अर्क रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यासाठी देखील मदत करतात.

Health Tips
Nirav Modi: 13,500 कोटींच्या आर्थिक घोटाळ्यात फरार नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

पेरू मधुमेहासह हृदयाच्या आरोग्यास देखील फायदेशीर आहे. पेरूमध्ये पोटॅशियम आणि विरघळणारे फायबर जास्त प्रमाणात असते जे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. याशिवाय, पेरूच्या पानांमध्ये उच्च प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे आढळतात, जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून बचाव आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात.

वजन कमी करण्यास उपयुक्त

पेरूमध्ये असलेले पोषक घटक वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. पेरूमध्ये 40 पेक्षा कमी कॅलरीज असतात. दैनंदिन गरजेच्या 12 टक्के फायबर यातून मिळू शकते. फायबरयुक्त पदार्थांमुळे पोट भरलेले वाटते आणि सारखी भूक लागत नाही. यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com