Health Tips: फळे खाल्यानंतर घ्यावी ही काळजी-

Health Tips: फळे खाल्यानंतर घ्यावी ही काळजी-
Take care after eating fruits

उन्हातुन फिरून आल्यावर पाणी पिण्याची इच्छा होते. तसेच काही तरी खावेसे वाटते. तेव्हा आपण फळ खाण्यास प्राधान्य देतो. कारण फळांमद्धे (Fruits) मुबलक प्रमाणात पाणी, फायबर, व्हीटेमिन्स आणि खनिजे असतात.  तसेच शरीराला हायड्रेटेड ठेवत असतात. परंतु फळांचे सेवन केल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी फायद्याचे आहे का ? तुम्ही घरात हे एकलेच असेल की फळ खाल्यानंतर पाणी पिणे टाळावे. खरंच तुम्हाला माहिती आहे का, फळ खाल्यानंतर थोडा वेळ तरी पाणी पिणे टाळावे.  आज याचबद्दल आपण जाणून घेऊया.  प्रत्येक पदार्थ हा आहारात योग्य प्रमाणात घेतल्यास त्याचे योग्य फायदे होतात. त्यामुळे पदार्थ हेल्डी आहे म्हणून कितीही खाणे  हे आरोग्यासाठी घटक असू शकते. (Take care after eating fruits)

फळ खाल्यावर कधी पाणी प्यावे- 

फळांमध्ये भरपूर प्रमाणात हायड्रेटिंग पॉवर असते. त्यामुळे आपली तहान शांत होण्यास मदत होते. परंतु तुम्हाला फळ खाल्यानंतर तहान लागली असेल तर 30 मिनिटे थांबून पाणी पिणे योग्य ठरू शकते. डॉक्टर आणि आरोग्यतज्ञ हे फळ आणि पाणी पिण्यातील अंतर साधारण 40 ते 50 मिनिटे असावा असा सल्ला देतात.  तुम्हाला जर फळ खाल्यानंतर जास्तच तहान लागली असेल तर 30 मिनिटानंतर फक्त दोन किंवा चार घोटच पाणी पिऊ  शकतो. परंतु एक तास पूर्ण झाल्यास तुम्ही संपूर्ण ग्लास पाणी पिऊ शकता. फळ खाल्यानंतर पचनक्रिया बिघडू शकते. पोटाची पीएच पातळी आम्लीय असते त्यामुळे फळ खाल्यास लगेच पाणी पिल्याने पचनक्रियेमद्धे आम्ल पातळी पाण्याने भरली जाऊन कमी होऊ शकते. तसे पाणी हे अन्न पचण्यास मदत करते. परंतु फळ खाल्यानंतर पाणी पिल्यास शरीरातील पंचनशक्ती मंद करते. यामुळे शरीरातील न पंचलेल्या अन्नामुळे छातीती जळजळ होऊन आंबट ढेकर आणि गॅसेसचा त्रास होऊ शकतो.    

अनेक फळांमध्ये भरपूर प्रमाणात साखर व यीस्ट असते. त्यामुळे ते योग्य रीतीने पाचने आवश्यक असते. तसे तर यीस्टमुळे पचनक्रियेस मदत होते.  परंतु पाणी पिल्याने ते पोटातच राहते. 
त्यामुळे कार्बनडायऑक्साईड तयार होऊन गॅस आणि पोट फुगणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून फळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे. यामध्ये  संत्री, टरबूज, पपई, अननस, स्ट्रॉबेरी, आंबा यासरखी फळे खाल्यानंतर ३० मिनिटे पाणी पिऊ नये.

फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्याने लूज मोशन देखील होऊ शकते. कारण फळांमध्ये आधीपासूनच पाण्याचे प्रमाण खूप असते. त्यामुळे पाणी पिल्यानंतर आतड्यांची हालचाल 
किंवा मल बाहेर फेकण्याची क्रिया चांगली होण्यास मदत होते. यामुळेच फळे खाल्ल्यानंतर आपल्याला जुलाब होण्याची शक्यता असते. पाण्याचे प्रमाण जास्त असलेले फळ म्हणजे टरबूज, काकडी, कलिंगड, लीची अशी फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्यास जुलाब होऊ शकते . कारण यावेळ पचन प्रक्रिया नकारात्मकरित्या जलद होते.


 

Related Stories

No stories found.