कॉलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी 'हे' घटक ठरतात गुणकारी

उच्च कॉलेस्ट्रॉल हा तुम्हाला अनुवंशीकतेने होऊ शकतो, परंतु ते सहसा टाळता येऊ शकते परंतु त्यासाठी तुम्हाला योग्य आहार नियोजनाची गरज आहे.
कॉलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी 'हे' घटक ठरतात गुणकारी
Health Tips: These factors are beneficial for controlling cholesterol Dainik Gomantak

उच्च कोलेस्टेरॉलमुळे तुम्हाला हृदयाच्या समस्या किंवा स्ट्रोक होण्याचा धोका जास्त असतो. आपल्या शरीराला निरोगी पेशी तयार करण्यासाठी कॉलेस्ट्रॉलची आवश्यकता असते, परंतु कॉलेस्ट्रॉलची उच्च पातळी या समस्यांचा धोका वाढवू शकते. उच्च कॉलेस्ट्रॉल हा तुम्हाला अनुवंशीकतेने होऊ शकतो, परंतु ते सहसा टाळता येऊ शकते परंतु त्यासाठी तुम्हाला योग्य आहार नियोजनाची गरज आहे.

 Health Tips: Cholesterol
Health Tips: Cholesterol Dainik Gomantak
Health Tips: These factors are beneficial for controlling cholesterol
गर्भावती महिलांनी या 3 वस्तु आपल्या जवळ ठेवाव्या

निरोगी आहार आणि नियमित व्यायाम केल्याने रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. जर तुमच्या डॉक्टरने तुम्हाला तुमच्या रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी तुमचा आहार बदलण्याचा सल्ला दिला असेल, तर यासाठी तुम्ही भरपूर फळे आणि भाज्यांसोबतच फायबरचे प्रमाण सुद्धा संतुलित ठेवा. हेल्दी ब्रेकफास्ट खाणे देखील अतिशय महत्त्वाचे आहे आणि असे काही पदार्थ आहेत जे तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतील.

कॉलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी कडधान्ये आणि तृणधान्य भूमिका

  • कडधान्ये किंवा तृणधान्य यामध्ये संपूर्ण धान्य असते तसेच साखर, चरबी आणि मीठाचे प्रमाण कमी असते

  • "मोड आलेली कडधान्ये हृदयाच्या निरोगी आहारासाथी एक उत्तम पर्याय आहे. निरोगी आहार आणि जीवनशैलीचा भाग म्हणून याचा नियमितपणे आहारात वापर करणे नेहमीच फायदेशीर ठरणार आहे.

  • कडधान्य असे आहे ज्यामध्ये धान्याचे सर्व गुणधर्म असतात आणि फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांसह पोषक तत्वांने परिपूर्ण असते.

  • जेव्हा धान्य दळलेले जाते, तेव्हा त्यामधून कोंडा आणि तंतु भाग काढून टाकले जातात, आणि याच कारणामुळे यातील काही पोषक घटक कमी होतात .

  • NHS नुसार संपूर्ण धान्य कार्बोहायड्रेट्स, जसे की होलमील ब्रेड, संपूर्ण धान्य तृणधान्ये, तपकिरी तांदूळ किंवा पास्ता मध्ये आढळतात.

  • चरबीचे दोन मुख्य प्रकार आहेत, जे संतृप्त आणि असंतृप्त आहेत. सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाल्याने तुमच्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते.

  • एनएचएसच्या मते, संतृप्त चरबीऐवजी असंतृप्त चरबी असलेले पदार्थ खाणे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकते.

Health Tips: These factors are beneficial for controlling cholesterol
जाणून घ्या ओट्स च्या दुधाचे हे अनोखे फायदे
Health Tips:  Cholesterol
Health Tips: Cholesterol Dainik Gomantak

आपल्या आहारातील चरबीचे एकूण प्रमाण कमी केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होते. गहू, भात, मका, राय, ओट, सातू, ज्वारी आणि ज्वारी वर्गातील पिके, बाजरी, नाचणी, वरी, राळा, सावा, कोद्रा व बंटी यांचा तृणधान्यांत समावेश होतो. यांतील बाजरी, नाचणी, वरी, राळा, सावा, कोद्रा व बंटी ही बारीक तृणधान्ये (मिलेट) आहेत. काही शास्त्रज्ञ ‘मिलेट’ हा शब्द दुय्यम प्रतीच्या तृणधान्यांसाठी वापरतात आणि गहू, भात, राय, ओट व सातू यांखेरीज सर्व तृणधान्यांचा समावेश त्यांत करतात. सर्व तृणधान्ये वर्षायू (एक वर्ष जगणारी) आहेत. गहू, राय, सातू व ओट ही पिके जगातील थंड हवामानाच्या प्रदेशांत आणि इतर सर्व पिके उष्ण अगर समशीतोष्ण भागांत होतात.

"जर तुमच्या डॉक्टरने तुम्हाला तुमच्या रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आहार बदलण्याचा सल्ला दिला असेल, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतृप्त चरबी कमी करणे,"

Related Stories

No stories found.