निरोगी आरोग्यासाठी खसखसची 'ही' स्मूदी एकदा ट्राय कराचं

दैनिक गोमंतक
गुरुवार, 6 मे 2021

आरोग्याबाबत जागरूक (health conscious) असला तर नक्कीच आपल्या आहारात खसखसच्या बियांचा पाककृतीमध्ये समावेश करावा.

खसखस ला इंग्लिश भाषेत पापीड बिया म्हणून ओळखले जाते. ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यातून बऱ्याच पाककृती बनवल्या जातात. उन्हाळ्यात अनेकांना असे पदार्थ खायला आवडतात, की जे पचायला हलके आणि त्वरित बनवल्या जातात. आशा परिस्थितीत खास खसखस ची ही रेसिपी नक्की बनून पाहा. (For health, try poppy smoothie once)

तुम्ही जर आरोग्याबाबत जागरूक (health conscious)असला तर नक्कीच आपल्या आहारात खसखसच्या बियांचा पाककृतीमध्ये समावेश करावा. चल तर मग जाणून घेऊया खसखसचे स्वादिष्ट पदार्थ. अनेकजण फिटनेससाठी स्मूदीचा आहारात समावेश करतात. खसखसची स्मूदी कशी बनवायची ते जाणून घेऊया-
 साहित्य: 
खसखस - 1/2 कप शिजवलेले 
केळी - 1 
पिनट बटर - 1 चमच
दूध - 1 ग्लास 
कोको पावडर - 1.5 टि  स्पून 
मध- 1 चमच

कृती -

* स्मूदी बनवण्यासाठी सर्व प्रथम खसखस, केळी, पिनट बटर आणि थोडे दूध मिक्स करून चांगले एकजीव करा. 
* नंतर या मिश्रणामध्ये मध, कोको पावडर आणि थोडेसे दूध घाला आणि पुन्हा चांगले एकजिव  करा. 
* शेवटी , सर्व दूध चांगले मिक्स करून त्याचे तयार मिश्रण एका ग्लासमध्ये सर्व्ह करता येईल

संबंधित बातम्या