Jeera Water Benefits: रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी आरोग्यदायी

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की लोक रिकाम्या पोटी त्या गोष्टींचं सेवन करतात ज्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतात.
Jeera Water Benefits
Jeera Water BenefitsDainik Gomantak

जर तुम्हाला निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात रिकाम्या पोटी जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करू शकता. जिऱ्यामध्ये असे अनेक पौष्टिक घटक आढळतात जे आरोग्यासाठी (Health) खूप उपयुक्त आहेत. तर दुसरीकडे जिऱ्याचे पाणी आरोग्याला अनेक समस्यांपासून वाचवू शकते. पोटी जिऱ्याचे पाणी पिण्याचे आरोग्याला काय फायदे आहेत हे जाणुन घेउया. (Jeera Water Benefits)

ज्या लोकांना अ‍ॅसिडिटी किंवा पोटदुखीचा त्रास असतो त्यां लोकांनी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्यावे. ते या दोन्ही समस्या दूर करू शकत नाही, तर जीर्‍याचे पाणी फुगणे आणि अपचनाच्या समस्येपासूनही आराम देते. जिर्‍याच्या पाण्याने पचनक्रियाही वेगवान होऊ शकते.

पावसाळ्यात (Monsoon) आपली प्रतिकारशक्ती मजबूत करणे खूप गरजेचे आहे. जिऱ्यामध्ये फायबर आढळते, जे केवळ रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. तसेच नियमितपणे जिऱ्याचे पाणी प्यायले अनेक आजार दूर राहतात.

Jeera Water Benefits
'या' वास्तु टिप्स वाढवतील आपल्या नात्यातील गोडवा

रिकाम्या पोटी जिर्‍याच्या पाण्यानेचे सेवन केल्याने वजन सहज कमी करू शकता. हे पाणी पचनसंस्था चांगली ठेउन तसेच चरबी कमी करण्यास मदत करते.

जिऱ्याच्या पाण्यात पोटॅशियमही मुबलक प्रमाणात आढळते. अशा परिस्थितीत जेव्हा एखादी व्यक्ती नियमितपणे जिऱ्याचे पाणी पिते, तेव्हा त्याद्वारे रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो.

जर तुम्ही उच्च रक्तदाब, कमी रक्तदाबाचे बळी असाल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुमच्या आहारात जिरे पाणी घालू शकता.

प्रेग्नेंसीमध्ये पोट दुखी, बद्धकोष्ठता, सर्दी अशा काही समस्यांपासून जिऱ्यामुळे तुम्हाला सुटका मिळू शकते .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com