Pregnancy Diet: प्रेग्नेंसीमध्ये कोणती फळ खावीत अन् कोणती नाही, जाणून घ्या एका क्लिकवर

गर्भवती महिलांच्या आहारात कोणत्या फळांचा समावेश करावा आणि कोणती फळे टाळावीत, हा सर्वात मोठा प्रश्न असतो चला तर मग जाणून घेउया याबद्दल अधिक माहिती.
pregnant women diet tips
pregnant women diet tips Dainik Gomantak

Pregnancy Diet: आई होणं प्रत्येक महिलेसाठी सुखद अनुभव असतो. परंतु गरोदरपणात आई आणि होणाऱ्या बाळाची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. प्रत्येक स्त्रीला स्वतःसाठी सुरक्षित आणि निरोगी गर्भधारणा हवी असते. गर्भवती महिलांनी आहारात कोणत्या फळांचा समावेश करावा आणि कोणती फळे टाळावीत, हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो. तर जाणून घेऊया याबद्दल अधिक माहीती.

गर्भवती महिलांनी या फळांचे सेवन टाळावे

  • पपई

पपईमध्ये भरपूर पोषक असतात. त्यात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. आरोग्याच्या दृष्टीने हे एक अतिशय आरोग्यदायी फळ आहे. पण गर्भधारणे दरम्यान हे फळ खाणे टाळावे. पपईमध्ये असलेल्या लेटेकमुळे गर्भाशयाचे आकुंचन, रक्तस्त्राव आणि अगदी गर्भपात होऊ शकतो. म्हणूनच गरोदरपणात पिकलेली आणि कच्ची पपई खाणे टाळावे.

  • पॅक केलेली फळे

गर्भवती महिलांनी पॅकबंद फळे कधीही खाऊ नयेत. हे बाळाला आणि आईसाठी विषारी असू शकते. गरोदर महिलांनी आहारात नेहमी ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करावा.

pregnant women diet tips
काकडीची साल फेकून देण्याऐवजी अशा प्रकारे करा वापर, आरोग्यासाठी ठरेल वरदान
  • अननस

अननस हे अतिशय चवदार आणि रसाळ फळ आहे. जे आरोग्यासाठी चांगले असते, परंतु गर्भधारणेदरम्यान ते खाणे त्रासदायक ठरू शकते. यामध्ये असलेले ब्रेमेलिन एन्झाइम वेळेपूर्वी प्रसूतीस कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे गरोदरपणात अननसाचे सेवन करू नये.

  • द्राक्ष 

गर्भवती महिलांनी द्राक्षाचे सेवन टाळावे.  यामध्ये रेझवेराट्रोल नावाचे संयुग असते, जे गर्भवती महिलांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. याचा परिणाम आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यावर होतो.

Avoid this fruits
Avoid this fruits Dainik Gomantak

गर्भवती महिलांनी या फळांचे सेवन करावे

  • केळी

गरोदरपणात केळीचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये भरपूर कार्बोहायड्रेट असते, जे महिलांना ऊर्जावान ठेवण्यास मदत करते. तुम्ही याचा अनेक प्रकारे आहारात समावेश करू शकता. परंतु तुम्हाला ऍलर्जी किंवा मधुमेह असल्यास गर्भधारणेदरम्यान केळी खाण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

  • सफरचंद 

गरोदरपणात सफरचंद खाणे खूप फायदेशीर मानले जाते. त्यात फायबर, पोटॅशियम आणि लोह पुरेशा प्रमाणात आढळते. जे शरीराच्या पौष्टिक गरजा पूर्ण करतात.

  • संत्री

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन-सी पुरेशा प्रमाणात असते. तसेच या फळामध्ये फोलेट असते, जे गर्भाशयात वाढणाऱ्या मुलाच्या विकासासाठी उपयुक्त आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com