
Healthy Office Snacks: निरोगी आरोग्यासाठी वेळेवर आणि पोषक आहार घेणे गरजेचे असते. पण अनेक वेळा ऑफिसमध्ये कामामुळे आपण खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष करतो. अशा वेळी आपण भुक घालवण्यासाठी चीप्स, पिझ्झा, बर्गर खातो. हे पदार्थ खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. यामुळे तुम्हाला ऑफिसमध्ये काम करताना भुक लागल्यास काही पौष्टिक पदार्थांचे सेवन करू शकता. ज्यामुळे तुम्हाला दिवसभर एनर्जी मिळेल आणि आरोग्य देखील निरोगी राहिल. असे पदार्थ कोणते आहेत हे जाणून घेऊया.
केळी
केळी ऊर्जाचा उत्तम स्त्रोत आहे. तसेच केळी खाल्याने पोट लगेच भरते. केळी खल्ल्याने बराच वेळ भुक लागत नाही. यामुळे ऑफिसमध्ये भुक लागल्यास केळी खाऊ शकता.
बदाम
बदाम पोषक तत्वांनी समृद्ध आहे. बदामामध्ये असलेले प्रथिने तुम्हाला भूक कमी करण्यास मदत करतात. ऑफिसमध्ये काम करताना तुम्ही बदाम खाऊ शकता.
सफरचंद
सफरचंद चीप्स,बर्गरपेक्षा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अँटिऑक्सिडंटने समृद्ध असलेल्या या फळामध्ये साखरेचे प्रमाण कमी असते. यामुळे ऑफिसमध्ये काम करताना भुक लागल्यास तुम्ही सफरचंद खाऊ शकता.
सोया नट्स
सोया नट्स भुक लागल्यावर स्नॅक म्हणून खाऊ शकता. यामध्ये फायबर, प्रथिने आणि इतर अनेक पोषक घटक असतात. सोयानट्स खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते. हृदय आणि हाडांचे आरोग्य देखील निरोगी राहते. तुम्ही सोया नट्स सॅलडमध्ये देखील खाऊ शकता.
मखाणा
मखाना खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. तुम्ही ऑफिसमध्ये स्नॅक म्हणून खाऊ शकता. कारण त्यात अनेक पोषक घटक असतात. मधुमेह आणि हृदयविकाराने ग्रस्त लोकांसाठी देखील फायदेशीर असते. तुम्ही मखाणा भाजून किंवा भेळ बनवून खाऊ शकता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.