Healthy Tips: मधुमेह रुग्णांनी या गोष्टी करणे टाळाव्या

मधुमेह असणाऱ्या लोकांनी आहारकडे (Diet) लक्ष्य देणे गरजेचे आहे.
Healthy Tips: मधुमेह रुग्णांनी या गोष्टी करणे टाळाव्या
Healthy hips: Diabetics should avoid doing these things Dainik Gomantak

बदलत्या जीवनशैलीमुळे आणि व्यायामाच्या अभावामुळे मधुमेह (Diabetes) हा आजार उद्भवत आहे. दिवसेंदिवस ही गंभीर समस्या बनत चालली आहे. मधुमेह असणाऱ्या लोकांनी आहारकडे (Diet) लक्ष्य देणे गरजेचे आहे. आहार (Diet) आणि व्यायाम (Exercise) या दोन गोष्टीमुळे मधुमेहावर (Diabetes) नियंत्रण ठेवता येते. यासाठी शरीरात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. हे फक्त योग्य आहारामुळेच (Diet) शक्य आहे. पण लोकांमध्ये या आजारबद्दल अनेक गैरसमज आहेत. ज्यावर ते सहज विश्वास ठेवतात. चल तर मग जाणून घेवूया 5 अशा गोष्टींवर ज्यावर लोक सहज विश्वास ठेवतात

* मधुमेह असलेल्या लोकांनी कर्बोदक पदार्थांचे सेवन टाळावे

मधुमेहाच्या रुग्णानी आपल्या आहारात कार्बोहायड्रेट्सचा समावेश करू नये. अनेक लोक यावर विश्वास ठेवतात. आरोग्य तज्ञांच्या मते, कार्बोहायड्रेट्स आरोग्यासाठी चांगले असते. परंतु कोणत्या प्रकारात आणि कोणत्या प्रमाणात खाल्ल्या जात आहे यावर लक्ष देणे आवश्यक आहे. मधुमेह रुग्णानी पास्ता, नूडल्स यासारखे पआदर्थ खाणे टाळावे.

* फॅटयुक्त पदार्थ खाणे टाळावे

आहारात फॅटयुक्त पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. पण सकस आणि पोषक अशा पदार्थांचा समावेश करावा. अधिक प्रमाणात फॅटयुक्त पदार्थ खाल्यास कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते. यामुळे हृदयविकार किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो.

Healthy hips: Diabetics should avoid doing these things
Kashmiri Garlic मधुमेह, हृदयरोग आणि रक्तदाबाच्या रुग्णांसाठी गुणकारी

* औषधीसोबत गोड खाणे

बाजारात कृत्रिम स्वीटनर उत्पादनाची कमतरता नाही जी विशेषत: मधुमेह रुग्णांसाठी तयार केली गेली आहे. पण सत्यही आहे की कृत्रिम स्वीटनर्स इन्सुलिन प्रतिकार खराब करतात. आरोग्य तज्ञांच्या मते, अनेक हानिकारक रसायने शुगर मुक्त उत्पादनामध्ये मिसळली जातात. हे आपल्या आरोग्यासाठी अधिक हानिकारक आहे.

* माधुमेह रुग्णासाठी फळे चांगले नाही

फळांमध्ये नैसर्गिक साखर असते. यामुळे मधुमेह रुग्ण फळांचे सेवन करत नाहीत. फळांमध्ये अनेक पोषक घटक असतात, त्यामुळे ते आरामात खाल्ले जाऊ शकतात. फळांचा ज्यूस न घेता फळे खावीत.

Related Stories

No stories found.