महिलांनो..कामाबरोबरच स्वत:कडेही लक्ष द्या; आहारात करा या पदार्थांचा समावेश

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

जकालच्या स्त्रिया शिकल्या सवरलेल्या असल्या तरी त्यांना काम,घर या दोन्ही व्यापामुळे तारेवरची कसरत करावी लागते.

जकालच्या स्त्रिया शिकल्या सवरलेल्या असल्या तरी त्यांना काम,घर या दोन्ही व्यापामुळे तारेवरची कसरत करावी लागते. या धकाधकीत आरोग्याचा तोल ढासळू नये, याकरिता स्त्रियांनी त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूक होणे आणि त्यांच्या आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश करणे अत्यंत महत्वाचे आहे. येथे काही खास पदार्थ आहेत जे महिलांच्या आरोग्यासाठी विशेष महत्वाचे आहेत.

महिला घरातली, बाहेरची चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत. महिला दिवसभर काय करत नाहीत, परंतु सर्व जबाबदाऱ्या पार पाडत आसताना स्वत: ची काळजी घ्यायला विसरू नका, स्वत:च्या आरोग्याचादेखील विचार करा. खरं तर, जेव्हा घरातील स्त्रिया निरोगी राहतात, तेव्हाच संपूर्ण कुटुंब आनंदी आणि निरोगी राहतं. अशा परिस्थितीत स्त्रियांना त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूक होणे आणि त्यांच्या आहारात हेल्दी फूड्सचा समावेश करणे महत्वाचे आहे. काही खासपदार्थ आहेत, जे महिलांच्या आरोग्यासाठी विशेष महत्वाचे आहेत. हे पदार्थ केवळ महिलांचे आरोग्य चांगले ठेवत नाहीत तर रोगांपासून दूरही ठेवतात.

टोमॅटो

टोमॅटो स्त्रियांचे चांगले आरोग्य राखण्यासाठी खूप उपयुक्त आहे. टोमॅटो प्रत्येक घरात असलंच पाहिजे, कारण ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. टोमॅटो प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरने समृद्ध असतात. हे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के चा एक चांगला स्रोत आहे. टोमॅटोमध्ये आढळणारी लाइकोपीन विशेषतः महिलांसाठी महत्वाची असते. यामध्ये अँटीऑक्सिडेंट देखील असतात जे त्वचेचे वृद्धत्व टाळतात. तसेच त्वचेची समस्या नैसर्गिकरित्या बरी होते.

पालक

महिलांनी आपल्या आहारात खनिजे आणि जीवनसत्त्वे समृद्ध असलेल्या हिरव्या हिरव्या भाज्या समाविष्ट केल्या पाहिजेत. मॅग्नेशियम समृद्ध पालक पीएमएसची लक्षणे कमी करतात. इतकेच नव्हे तर पालक हाडे मजबूत बनवतात. हे नियमित खाल्ल्याने रक्तातील साखरेवर नियंत्रण राहते आणि दम्याचा त्रासही दूर होतो.

फ्लेक्स बियाणे

फ्लेक्स बियाणे ओमेगा -3 ने समृद्ध असतात, ज्यामुळे ते आपल्या हृदय आणि रक्तातील साखरेसाठी चांगले आहे. त्यात एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील असतात, ज्यामुळे महिलांनी याचे दररोज सेवन केल्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते. यामध्ये फायबर आणि लोह देखील आहे. इतकेच नाही, तर व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, प्रथिने, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, मॅंगनीज आणि फायटोएस्ट्रोजेन यासारखे खनिजही त्यात आढळतात जे महिलांसाठी प्रत्येक प्रकारे फायदेशीर ठरतात.

क्रॅनबेरी

महिलांमध्ये यूटीआयची समस्या सामान्य आहे. अशा परिस्थितीत क्रॅनबेरी महिलांसाठी खूप फायदेशीर असते. हे यूटीआयपासून संरक्षण करते स्वादिष्ट असण्याबरोबरच क्रॅनबेरी हृदयरोग आणि दात किडणे देखील प्रतिबंधित करते. यात फायटोन्यूट्रिएंट्स, अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत जे महिलांना बर्‍याच रोगांपासून वाचवतात.

ओट्स

ओट्स कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. इतकेच नाही तर ते पीएमएस आणि मूड स्विंग्सशी संबंधित अडचणी टाळण्यास देखील सक्षम आहे. हे केवळ हृदयासाठीच चांगले नाही तर पचन देखील सुधारते. त्याशिवाय रक्तदाबही नियंत्रित ठेवते.

 

संबंधित बातम्या