उन्हाळ्यात अशी घ्या केसांची काळजी, वाचा सविस्तर

दैनिक गोमंतक
गुरुवार, 22 एप्रिल 2021

प्रत्येकाला आपले केस हे सुंदर, काळे, दाट, लांब आणि चमकदार असले पाहिजे असे वाटते. तेव्हा केसांची काळजी घेणे गरजेचं आहे. प्रखर उन्हापासून केसांचे रक्षण करावे लागतेच. प्रदूषणामुळे आणि कडक उन्हामूळ केस खराब होऊ शकतात.

प्रत्येकाला आपले केस हे सुंदर, काळे ,दाट ,लांब आणि चमकदार असले पाहिजे असे वाटते. तेव्हा केसांची काळजी घेणे गरजेचं आहे. प्रखर उन्हापासून केसांचे रक्षण करावे लागतेच. प्रदूषणामुळे आणि कडक उन्हामूळ केस खराब होऊ शकतात. (Here's how to take care of your hair in summer, read more)

'फेक न्यूज' कशी ओळखाल; वाचा सविस्तर

उन्हाळ्याचमध्ये सर्वच  घामाने  त्रासून जातात. अशातच महिलांना लांब केसाची काळजी कशी घ्यावी हा प्रश्न पडतो. परंतु उन्हाळ्यात देखील केसांच सौंदर्य कायम ठेवण्यासाठी   वाचा या ब्युटी टिप्स. 

१) केसांना १५ दिवसानी एकदा तरी मेहंदी लावावी  कारण ते कंडिशनरच काम करते. 
२) आठवड्यातून एकदा अंड्याचा आणि दह्याचा वापर करावा. 
३) लिंबाच रस, बेसण  आणि दही सारख्या प्रमाणात घेऊन केसांची मसाज करावी आणि शेवटी लिंबाच्या रसाने केस स्वच्छ धून  घ्यावे. त्यानंतर सद्य पाण्याने धुवावे . 
४) शिकेकाई, संत्र पावडर, जास्वंद यांची पावडर आणि खोबऱ्याचा तेल एकत्र करून केसांना मसाज करावी. १५ मिनिट नंतर केस धुवावे. 
५) गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळून त्या पाण्याने केस धुवावे. केसांमध्ये चमक येते आणि मुलायम होतात. 
६) केसांच्या आरोग्यासाठी योग्य आहार घेणे देखील गरजेचे आहे. पालेभाज्या, बदाम, नारळ आणि मासे  इत्यादी आपल्या आहारात असेल तर केस चांगले राहतात.
७)  ब्युटी पार्लर मध्ये  होणाऱ्या केसांच्या ट्रेंटमेन्ट उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कमीत कमी कराव्या. यामुळे केस गळणे केसात चाई पडणं  असे त्रास कमी होतात. 
८) केसांना धूळ- माती आणि उन्हापासून वाचवण्यासाठी तसेच  घराबाहेर जाताना  सक्र्फचा वापर करावा. 

कोरफडचा रस पिण्याचे फायदे; केस गळती, लठ्ठपणा आणि बरच काही

काही इतर उपाय - उन्हाळ्याच्या दिवसात सतत घाम येऊन खाज येते आणि त्यामुळे केसगळती होऊन चाई होण्याची शक्यता असते. आठवड्यातून ३ वेळा केस धुवावे. केसातील कोंडा कमी करण्यासाठी केसांच्या मुलांना लिंबाचा रस लावून २० मिनिटापर्यंत ठेवा नंतर गार पाण्याने केस धुवावे. तसेच केसांना आवळ्याचा रस लावल्याने केस मऊ आणि चमदार राहतात. अशा प्रकारे आपण उन्हाळ्यात देखील केस सुंदर ठेऊ शकतो. 

संबंधित बातम्या