इथं महिला आयुष्यात फक्त एकदाच अंघोळ करतात

'या' महिलांना पाण्याचा वापर करत कपडेही धुता येत नाहीत
Himba Women
Himba Women Dainik Gomantak

जगात अशा अनेक वेगवेगळ्या आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे राहणीमान, पेहराव, भाषा यासह अनेक पद्घती या परंपरेला धरुन सुरु असतात. त्या कधीच बदलल्या जात नाहीत. अथवा या जमाती ते बदलण्याचा प्रयत्न देखील करत नाहीत. आफ्रिकेत राहणारी एक जमात यापैकीच एक असून ते अजूनही आपल्या काही परंपरांवर विश्वास ठेवतात, ज्याबद्दल ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. नामेबिया देशातील हिम्बा जमात अशा परंपरा आज ही जपते आहे. ( Himba tribe of Namibia, women bathe once in a lifetime )

नामिबियामध्ये राहणारी हिम्बा जमातीच्या महिला आयुष्यात फक्त एकदाच आंघोळ करतात, तेही त्यांच्या लग्नाच्या दिवशी (Himba Women Bath only Once in Life). याशिवाय तिला पाण्याचा वापर करून कपडेही धुता येत नाहीत. स्वतःला स्वच्छ ठेवण्यासाठी हिंबा जमातीच्या स्त्रिया पाण्यात विशेष औषधी वनस्पती उकळतात आणि त्याच्या वाफेने स्वतःला स्वच्छ करतात. त्यामुळे शरीरातून दुर्गंधी येत नाही.

याशिवाय उन्हापासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी महिला प्राण्यांच्या चरबीपासून आणि लोह, हेमॅटाइट सारख्या खनिज घटकांपासून खास लोशन बनवून शरीरावर लावतात. या घटकांमुळे शरीर लाल होतं, ज्यामुळे ती स्वतःला पुरुषांपासून वेगळं करू शकते.

Himba Women
Healthy Ragi Chila Recipe: वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात नाचणीचे पराठे सर्वोत्तम

अशा खास परंपरा ही जमात आज ही जपते आहे कारण आज ही या जमातीचा आपल्या चालीरितींवर दृढ विश्वास आहे. ज्याच्यामूळे ते या सर्व परंपरा या 21 व्या शतकात ही अगदी सहज जपतात. या जमातीत मुलाच्या जन्माबाबत खूप रंजक परंपरा आहे. इतर ठिकाणांप्रमाणे या जमातीतील मूल या जगात जन्माला येतं तेव्हा त्याची जन्मतारीख विचारात घेतली जात नाही. तर जेव्हा स्त्रीला वाटतं की ती मुलाला जन्म देईल, तेव्हापासून या मुलाची जन्मतारीख गृहीत धरली जाते. अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एक स्त्री एका झाडाखाली बसते आणि बाळाला जन्म देण्याशी संबंधित गाणं ऐकण्याचा प्रयत्न करते. जेव्हा तिला असं वाटतं की मुलाने तिला गाणं सुचवलं आहे, म्हणजे गाणं जेव्हा तिला सुचतं, तेव्हा ती हे गाणं तिच्या जोडीदाराला सांगते. यानंतर दोघंही शारीरिक संबंध ठेवतानाही हे गाणं गातात. संबंधित स्त्री गरोदर राहिल्यावर ती हे गाणं जमातीतील इतर स्त्रियांना शिकवतं आणि सर्वजणी ते गाणं लक्षात ठेवतात. यानंतर गरोदरपणादरम्यान सगळे तिला घेरतात आणि हे गाणं सुनावतात. त्यामूळे आजपर्यंत आदिवासी जमातींमध्ये अनेक वेगवेगळ्या चारीरिती आपण वाचल्या ऐकल्या असतील मात्र हिम्बा जमात यात अलगच ठरते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com