Hindi Diwas 2021: "राष्ट्रभाषा के बिना राष्ट्र गूँगा होता है"

हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नव्हे तर हिंदी ही भारताची राजभाषा
Hindi Diwas 2021
Hindi Diwas 2021Dainik Gomantak

भारतात 14 सप्टेंबर हा हिंदी दिवस (Hindi Diwas 2021) म्हणून साजरा केला जातो. ह्याच दिवशी1949 वर्षी संविधान सभेमध्ये देवनागरी लिपीत लिहिल्या जाणाऱ्या हिंदी भाषेचा भारताची राजभाषा (National Language) म्हणून स्वीकार झाला होता. लक्षात ठेवण्यासारखी मुख्य गोष्ट म्हणजे हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नव्हे तर हिंदी ही भारताची राजभाषा आहे.

भारत देशाला राष्ट्रीय खेळ व राष्ट्रभाषा हे दोन्ही प्रकार नाहीत. हिंदी राष्ट्रभाषा बनण्यापासून कशी मुकली ह्यात खूप राजकीय व सामाजिक पण मुद्दे आहेत. हिंदी भाषेला दक्षिण भारतीय लोकांनी खूप विरोध केला. खूप दक्षिण भारतीय मित्रांकडून मी असंही ऐकलंय की त्यांचा विरोध हिंदी भाषेला नव्हता, तर जबरदस्ती हिंदी थोपविण्यात येत होती, त्याला विरोध होता. भारतात खूप भाषा आहेत. सर्वच भाषांना देशाची राष्ट्रभाषा करता येत नाही. म्हणून विस्तृत क्षेत्रात बोलली जाणारी भाषाच ही राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारावी असे गांधीजींचे मत होते. हे सत्य पण लोकांनी समजून घ्यायला हवं.

Hindi Diwas 2021
Oscar Fernandes: गोव्याने सच्चा मित्र गमावला!

गांधीजींनी म्हटले होते, राष्ट्रभाषा के बिना राष्ट्र गूँगा होता है। आजही भारत देश एक प्रकारे मुकाच आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. कारण सर्व काम इंग्रजीत केले जाते व खूप वेळा उपचार म्हणून त्याचे हिंदी भाषांतर मागविले जाते. (ते कोण वाचतो हा मोठा प्रश्नचिन्ह आहे!) जशी 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला देशभक्ती अचानक जागृत होते, तसे 14 सप्टेंबरला अचानक हिंदी भाषेवर 'आज फिर तुमपे प्यार आया है' अशी स्थिती होते.

भारतात आताच काही राज्यात हिंदीतून अभियांत्रिकी शिक्षण, वकिली शिक्षण सुरू झालेले आहे. मातृभाषेतून शिकलेले जास्त लवकर समजते व विद्यार्थ्यांचा बौद्धीक विकास होतो. भारतात जर तुम्ही, ‘हिंदीतून बोलू?’ असे विचारले तर पुढचा माणूस त्याचा हाच अर्थ घेतो की तुम्हाला इंग्रजी येत नाही. कोणतीही भाषा हा बुद्धी मापण्याचा 'टूल' नाही. भाषा विचार-विनिमयासाठी असते.

Hindi Diwas 2021
World Sexual Health Day: डिजिटल जगातील लैंगिक आरोग्य

14 सप्टेंबर म्हणजे हिंदी दिवस हे आपण लहानपणापासून ऐकतो. अन्य कुठल्याही भाषेचा दिवस असे आपण कधीही ऐकले नसणार, 'इंग्रजी भाषा दिवस' वगैरे. हिंदी दिवसाच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात, ‘दिवस’, ‘सप्ताह’ ते ‘पंधरवाडा’ पर्यंत असे त्यात हिंदीची हत्याच केली जाते. जितकी वर्षभर हिंदी भाषा मोकळा श्वास घेते, तितकी एकाच महिन्यात तिचं 'श्राद्ध' केलं जातं! (कधी-कधी हिंदी दिवस पितृपक्षातच येतो!) आजपासून अशा प्रकारे हिंदीचा वापर करा की आम्हाला भविष्यात वेगळा 'हिंदी दिवस' साजरा करायला पडणार नाही.

- आदित्य सिनाय भांगी,

साहाय्यक प्राध्यापक, हिंदी विभाग, गोवा विद्यापीठ.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com