Holi 2021: होळी रंगे सुरासंगे; बघा टिझर

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 27 मार्च 2021

होळीवर अनेक मराठी- हिंदी गीते रचण्य़ात आली, त्यापैकी 'आला होळीचा सण लई भारी,' शिमगा उगवला,' 'होळी रे होळी' अशा गाण्यंचा  समावेश होतो.

फाल्गुन पोर्णिमेला होळीचा सण भारतामध्ये अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. होळीला अनेक नावे आहेत, त्यामध्य़े होळी पोर्णिमा, होलिकोत्सव, शिमगा, धुलवड, होळी पोर्णिमा, धूलिवंदन आणि रंगपंचमी. होळीचा सण भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा सण मानला जातो, आणि देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. महाराष्ट्रातही होळीचा सण मोठ्या उत्सहात साजरा करण्य़ात येतो. कोकणात होळीचा उत्सव अतिशय मोठा मानला जातो. होळीचा सण हा शेतकरी वर्गाच्या निवांत काळात येतो. होळीचा सण हा कवी आणि गायकांच्या आवडीचा मानला जातो. होळीवर अनेक मराठी- हिंदी गीते रचण्य़ात आली, त्यापैकी 'आला होळीचा सण लई भारी,' शिमगा उगवला,' 'होळी रे होळी' अशा गाण्यंचा  समावेश होतो.

भारतातील आदीवासी जमातीतील स्त्री-पुरुष होळीचा सण गुलाल उधळून साजरा करतात. टिमक्या-ढोल वाजवून, नृत्य करुन उत्साहाने साजरा करतात. शिमग्यानिमित्त आदीवासी लोक आपल्या भोजनामध्ये गोड पुरी, मासळी आणि गोड भात या पदार्थांचा समावेश असतो.

मात्र सध्या कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता देशामधील अनेक राज्यांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या आनंदाला पाणी फेरलं गेलं आहे. शासनाने वाढता कोरोनाचा धोका पाहता जमावबंदीचे कडक निर्बंध लावले आहेत. हे निर्बंध काहीसे आपल्या हिताचेच आहेत. कोरोनाचा सामना आपणा सर्वांना एकत्र मिळून करायचा आहे. आणि शासनाला सहकार्य करायचे आहे.

परंतु तुम्ही अजिबात नाराज होऊ नका, आपण यावर्षीचा होळीचा सण घरी बसून आनंदात साजरा करु शकतो. तो कसा ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कारण आम्ही तुमच्यासाठी खास भेट घेऊन आलो आहोत. जगामध्ये अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. आपण आपल्य़ा घरी बसून होळीचा आनंद लुटु शकतो. ही तरी सर्वात सोपी गोष्ट आहे.

सध्या आपल्यावर कोरोनाचे संकट आले असताना या वर्षीचा होळी सण आपण हटक्या अंदाजात साजरा करु शकतो. सध्या तरुणाईला म्युझिकल बॅंन्डचं प्रचंड आकर्षण आहे. बॅंड वाजवायला तसेच एकायला खूप आवडतो. म्हणून  होळीच्या उत्सवावर सुरांचा, संगीताचा बॅंड वाजवून आपल्या घरीच नाचून, गाऊन होळी साजरी करुया. कोरोनाने आपल्या सण-उत्सववावर विरजन पाडले असले तरी आपण Sakal Holi 2k21 कार्यक्रमाचा आनंद घेऊन यंदाची होळी आपण उत्सहात साजरी करु शकतो. होळी निमित्त एक म्युझिकल ट्रिट येत्या 28 तारखेला अर्थात  रविवारी संगीताचा आनंद आम्ही तुम्हाला देणार आहोत. कोरोनाचे नियम पाळून यंदाची होळी आपण आनंदात, उत्सहात साजरी करुया. त्यामुळे या उपक्रमाला हातभार म्हणून आम्ही तुम्हाला सुरांच्या रंगात रंगवणार आहोत. होळीच्या रंगासोबत यावर्षी सुरांचा रंग असणार आहे. शासन, प्रशासनाला सहकार्य करत आपण यावर्षी होळीचा सण साजरा करुया. 

 

संबंधित बातम्या