Holi 2021: आपल्याला रंगांची एलर्जी असेल तर या टिप्स वापरुन पहा; आणि करा त्वचेच रक्षण

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 29 मार्च 2021

होळीचा उत्सव म्हटल की रंग आलाच कारण रंगाशिवाय होळी बेरंग आहे. रंगाशिवाय होळी पूर्ण होवूच शकत नाही. म्हणून होळीला रंगांचा सण म्हटलं जात. पण होळीला खेळल्या जाणाऱ्या रंगांमध्ये अनेक प्रकारचे  रसायने  वापरले जाते. बर्‍याच लोकांना या रंगांमुळे अलर्जी होते

होळीचा उत्सव म्हटल की रंग आलाच कारण रंगाशिवाय होळी बेरंग आहे. रंगाशिवाय होळी पूर्ण होवूच शकत नाही. म्हणून होळीला रंगांचा सण म्हटलं जात. होळी च्या आधीपासूनच या उत्सवाची खळबळ बाजारात दिसू लागली होती. कोणी रंग आणि गुलाल खरेदी करण्यात व्यस्त आहे तर कुणी घागर. वास्तविक, होळी हा आनंदोत्सव आहे, परंतु काही लोकांसाठी हा उत्सव थोडा घातक पण ठरू शकतो.

होळीला खेळल्या जाणाऱ्या रंगांमध्ये अनेक प्रकारचे  रसायने  वापरले जाते. बर्‍याच लोकांना या रंगांमुळे अलर्जी होते. यामुळे, एकतर या लोकांना उत्सवाचा पूर्ण आनंद घेता येत नाही किंवा होळी खेळल्यानंतर ते त्वचेवर त्याचा परिणाम सहन करू शकत नाही. जर तुम्हीही त्या लोकांपैकी असाल तर आताच रंगांच्या दुष्परिणामांपासून वाचविण्यात या टिप्स उपयोगी ठरतील.

1. होळी खेळण्यापूर्वी आपल्या चेहऱ्यावर सनस्क्रीन लावा कारण आपण बहुतेक घराबाहेर होळी खेळतो. अशा परिस्थितीत, कधीकधी रंगामधले काही रसायने सूर्यप्रकाशासह त्वरीत रिएक्ट करतात. अशावेळी सनस्क्रीन आपल्या त्वचेचे रक्षण करेल.

2. त्वचा संबंधित समस्या दूर करण्यासाठी जुन्या काळापासून पेट्रोलियम जेली प्रभावी मानली जात आहे. होळी खेळण्यापूर्वी पेट्रोलियम जेली त्वचेवर आणि नखांवरही चांगले लावा. यामुळे रंग आपल्या थेट त्वचेपर्यंत पोहचणार नाही. तसच, रंग सहजपणे काढून टाकण्यास देखील मदत होईल.

3. स्पेशली मुली रंगांपासून वाचवण्यासाठी नेल पेंट देखील वापरु शकतात. परंतु असे करण्याअगोदर, नखे कापून घ्या अन्यथा तुमच्या नखांमध्ये रंग भरू शकतात.

4. रंगांचा परिणाम टाळण्यासाठी एक घरगुती उपचार म्हणजे मोहरीचे तेल किंवा तूप. यापैकी काहीही यापूर्वी चेहऱ्यावर लावा, नंतर जोरदार आणि धडाक्यात होळी खेळा. यामुळे रंगांच्या दुष्परिणामांपासून आपल्या त्वचेचं संरक्षण होइल. त्वचेवरील रंग देखील सहजपणे काढता येईल.

5. रंग खेळतांना केसांवर देखिल त्याचा परिणाम होतो. आपले केस डॅमेज होण्याची जास्त शक्यता असते. तेव्हा रंग खेळण्याआधी केसांमध्ये चांगले तेल लावा. यामुळे केसांमधला रंग सहजतेने काढू शकाल. अन्यथा, हा रंग आपल्या केसांच्या मुळांपर्यंत पोहोचू शकतो आणि केस कोरडे पडू शकते.

6. आपल्या हात आणि पायांवर मॉइश्चरायझर लावा. हवे असल्यास तेल किंवा तूप देखील लावू शकता.

संबंधित बातम्या