होळी 2021: होळीच्या दिवशी करा हे उपाय, होणार सर्व समस्या दूर

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 20 मार्च 2021

होळी हा आनंदाचा आणि मजा मस्ती करण्याचा सण आह. हा सण धार्मिक दृष्ट्या खूप महत्वाचा मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी केलेले ध्यान किंवा उपाय फार महत्वाचे असतात.

होळी हा आनंदाचा आणि मजा मस्ती करण्याचा सण आह. हा सण धार्मिक दृष्ट्या खूप महत्वाचा मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी केलेले ध्यान किंवा उपाय फार महत्वाचे असतात. यावेळी होळीचा सण 28 आणि 29 मार्च 2021 या दिवशी साजरा केला जाणार आहे. तुमच्या आयुष्यातही काही समस्या असल्यास होळीच्या दिवशी काही खास उपाय करून तुम्ही या समस्यांवर मात करू शकता. 
      
1. जर आपण आर्थिक, मानसिक, शारीरिक किंवा इतर कोणत्याही प्रकारची समस्येने त्रासले असाल तर एक उपाय आहे ज्यामुळे कोणत्याही प्रकारची समस्या दूर करण्यास मदत होऊ शकते. यासाठी तुम्हाला एक नारळ खरेदी घ्यावा लागेल. होळी पेटवण्यापूर्वी  तुम्ही अंघोळ करा आणि स्वच्छ आणि कपडे घाला. त्यानंतर आपल्या अंगावरून सात वेळा नारळ उत्तरवा. आपल्या मनातील आपल्या आवडत्या देवाचे चिंतन करून, आपला त्रास दूर करण्यासाठी प्रार्थना करून पेटत्या होळीत नारळ अर्पण करा. यानंतर, सात वेळा आग्नीभोवती फिरा आणि देवाला तुमची समस्या दुर करण्यासाठी प्रार्थना करा.

World Sparrow Day 2021: एक नजर चिमण्यांच्या जगात 

2.तुमच्या घरात जर भरपूर पैसा असेल तर होळीच्या दिवशी घरी किंवा मंदिरात देवी लक्ष्मीची पूजा करा. त्यांच्यासमोर विष्णू स्तोत्र वाचा आणि आपली समस्या दूर करण्यासाठी प्रार्थना करा. यानंतर त्या दिवशी गरजूंना क्षमतेनुसार काहीतरी दान करा.

3.आपल्या घराच्या किंवा घराभोवती नकारात्मकता जाणवत असेल तर होळीच्या दुसऱ्या दिवशीं जी होळीची राख असते ती काढून दरवाजावर आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यावर लावा.

Happy Birthday: अलका-नीरज च्या नात्याबद्दल कुटुंबीयांना दिला होता इशारा 

4. जर एखाद्या व्यक्तीला घरात खूप राग येत असेल तर, होळीच्या दिवसापासून सलग तीन दिवस, त्याच्या डोक्यावरुन मुठभर मीठ सात वेळा उतरून टाका, आणि घराबाहेर फेकून द्या. यामुळे खूप फरक पडेल. 

5. जर तुमचं लग्न होत नसेल तर होळीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर एक अखंड सुपारी व हळकुंड घेऊन शिवलिंगाच्या मंदिरात जाऊन समर्पित करा. दिवसभर शिवलिंगाच्या मंदिरात प्रार्थना करा. मात्र हे उपाय गुप्त पद्धतीने केले पाहिजेत हे लक्षात ठेवा. मंदिरातून परतताना मागे वळून पाहू नका.

Summer Fashion:  या 5 एक्सेसरीज देतील तुम्हाला उन्हाळ्यात कूल आणि स्टाइलिश लूक 

संबंधित बातम्या