Remedies For Split Ends Hair| स्प्लिट एंडमुळे त्रस्त आहात? तर मग असे करा घरगुती उपाय

अनेक वेळा केसांना स्प्लिट एंड येण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे केस खूपच खराब दिसतात. मात्र, काही घरगुती उपायांनी तुम्ही या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता.
Remedies For Split Ends Hair
Remedies For Split Ends HairDainik Gomantak

स्प्लिट एंड्स हेअरसाठी उपाय: सुंदर केस कुणाच्याही सौंदर्यात भर घालतात. मात्र, आजकाल जीवनशैली, सौंदर्य उत्पादने आणि वाढते प्रदूषण यामुळे केस खराब होत आहेत. केस गळणे, पांढरे होणे आणि स्प्लिट एंड या समस्या खूप वाढल्या आहेत. काही लोकांच्या केसांमध्ये स्प्लिट एंड येण्याची समस्या खूप जास्त असते. याला ट्रायकोप्टिलोसिस म्हणतात.

(home Remedies For Split Ends Hair)

Remedies For Split Ends Hair
Navratri 2022: नवरात्रीमध्ये देवी होईल प्रसन्न!नवरंगाचे जाणून घ्या महत्व

ही समस्या कमी करण्यासाठी केस वारंवार ट्रिम करत राहा. सकस आहार घ्या. तुम्हाला हवे असल्यास केसांवर काही घरगुती उपाय देखील करून पाहू शकता. अशा प्रकारे तुम्ही स्प्लिट एंड्सपासून मुक्त होऊ शकता.

केस गळतीसाठी घरगुती उपाय

1- अंड्याचे हेअर मास्क- अंडी प्रत्येकाच्या केसांसाठी फायदेशीर आहे, परंतु ज्या लोकांना केसांमध्ये स्प्लिट एंडची समस्या जास्त असते त्यांनी केसांना अंड्यापासून बनवलेला हेअर मास्क जरूर लावावा. अंड्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असते ज्यामुळे केस निरोगी राहतात. यासाठी 1 अंड्यामध्ये 1 चमचा मध आणि 3 चमचे ऑलिव्ह ऑईल मिसळा. हा पॅक केसांवर तासभर राहू द्या आणि नंतर शॅम्पू करा.

२- पपई आणि दही हेअर मास्क- पपई आणि दही स्प्लिट एंडसाठी फायदेशीर आहेत. स्प्लिट एंडची समस्या कमी करण्यासाठी पपईपासून बनवलेला हेअर मास्क केसांवर लावा. यासाठी पिकलेल्या पपईचा लगदा घ्या आणि त्यात दही मिसळा. आता केसांना लावा आणि कोरडे झाल्यानंतर शॅम्पू करा.

Remedies For Split Ends Hair
Addiction Of Smoking: सिगारेटचे व्यसन सोडायचे आहे? मग फॉलो करा या घरगुती टिप्स!

३- मध आणि दह्यापासून बनवलेला हेअरमास्क लावा- जर तुम्हाला स्प्लिट एंड केस मुळापासून दूर करायचे असतील तर केसांवर मध आणि दही वापरा. यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होईल आणि स्प्लिट एंडही कमी होतील. यासाठी थोडं दही घ्या आणि त्यात 2 चमचे मध मिसळा. अर्धा तास केसांवर राहू द्या आणि नंतर शॅम्पू करा.

४- केळीपासून बनवलेला हेअरमास्क लावा- स्प्लिट एंड केस काढण्यासाठी केसांना केळी लावा. केळीपासून बनवलेला मास्क लावल्याने केसांना पोषण मिळते. हे पोटॅशियम, जस्त, लोह आणि जीवनसत्त्वे ए, सी आणि ई यांची कमतरता पूर्ण करते. यामुळे केस गळणे आणि स्प्लिट एंड्स कमी होतात. यासाठी एक पिकलेले केळ घेऊन ते चांगले मॅश करून अर्धा तास केसांना लावा आणि नंतर शॅम्पू करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com