Homeopathic Medicines: होमिओपॅथी औषधं खरंच उशीरा परिणाम करतात का? जाणून घ्या तज्ञांचे मत

होमिओपॅथी औषधे खूप उशीरा परिणाम करतात म्हणजेच कोणताही आजार बरा होण्यास बराच वेळ लागतो.
Homeopathy
HomeopathyDainik Gomantak

Homeopathic Medicines: होमिओपॅथिक औषध अनेक आजार पुर्णपणे कमी करण्यास मदत करतात. पण अनेकांच्या मते होमिओपॅथिक औषध ही उशीरा परिणाम करतात. यामुळे आजार देखील उशीर बरे होतात.

आजसुद्धा लोकांचा या औषध पद्धतीवर पूर्ण विश्वास आहे. पण त्यांना बऱ्याचदा एका गोष्टीची चिंता असते की होमिओपॅथी औषधे खूप उशीरा कार्य करण्यास सुरवात करतात.

ती म्हणजे या औषधांमुळे रोग बरा होण्यास बराच वेळ लागतो. पण जनतेचा हा दावा खरा आहे का? होमिओपॅथी औषधांना खरच काही महिने किंवा वर्षे लागतात का? जाणून घेऊया तज्ज्ञांचे मत काय आहे.

प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, तज्ञांचे म्हणणे आहे की, कोणतेही होमिओपॅथी औषध घेताना लोक त्याचा किती काळ परिणाम दिसायला लागतील याचा विचार करायला लागतात. तर त्यांनी या औषधाचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होईल याचा विचार करायला हवा. 

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर एखाद्या आजाराची लक्षणे योग्य प्रकारे ओळखली गेली आणि त्यानुसार औषधे दिली गेली तर होमिओपॅथी उपचार वेगाने सुरू होऊ शकतात. म्हणजेच बरे होण्याची प्रक्रिया लवकर सुरू होते.

Homeopathy
Relationship Tips: असं ठरवा EX ला आयुष्यात पुन्हा स्थानं द्यायचे की नाही?
  • छोट्या आजारांवर लवकर परिणाम

तज्ज्ञांच्या मते, किरकोळ शारीरिक समस्या असल्यास, होमिओपॅथी औषधांचा परिणाम लवकर दिसून येतो. तर काही गंभीर आणि धोकादायक आजारात ही औषधे अतिशय संथ गतीने काम करतात. 

याचे कारण असे की गंभीर रोग विकसित होण्यास बराच वेळ लागतो आणि जेव्हा ते शरीरात वाढू लागतात तेव्हा ते हळूहळू विस्तारतात.

कधीकधी ते परिस्थिती इतकी गुंतागुंतीची बनवतात की रुग्णाला वाचवणे देखील कठीण होते. कोणत्याही आजारापूर्वी आपले शरीर खूप लढण्याचा प्रयत्न करते.

परंतु जेव्हा एखाद्या विषाणूची पकड मजबूत होते, तेव्हा औषधे देखील हळू हळू काम करतात. अशावेळी कोणताही रोग मुळापासून नष्ट करणे फार कठीण होऊन बसते.

Homeopathy
Homeopathy Dainik Gomantak
  • रोग मुळापासून नष्ट करण्यास फायदेशीर

गंभीर आजारांच्या बाबतीत होमिओपॅथी औषधे त्यांचा प्रभाव खूप हळू दर्शवतात. किरकोळ समस्यांमध्ये ही औषधे त्वरीत कार्य करतात. 

होमिओपॅथीची औषधे जलद परिणाम दाखवण्याऐवजी संथ गतीने रोग मुळापासून दूर करण्याचे काम करतात. त्यामुळेच त्याचा परिणाम दीर्घकाळानंतर दिसून येतो. 

'या' पाच प्रकारच्या आजारांवर होमिओपॅथी उपचार फायदेशीर

  • ऑटो-इम्यून रोग (Auto-immune Diseases)
    यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. हे संधिवात, सेलिआक रोग, स्जोग्रेन्स सिंड्रोम, अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस, अलोपेसिया या आजारांवर होमिओपॅथिक औषधी फायदेशीर ठरतात.

  • डीजनरेटिव्ह रोग (Degenerative Diseases)
    यामध्ये व्यक्तीच्या शरीरातील ऊती किंवा शरीराचे विविध भाग काम करणे थांबवतात. यामध्ये ऑस्टियोआर्थरायटिस, कॅन्सर, ऑस्टिओपोरोसिस यांसारख्या आजारांचा समावेश आहे.

  •  मासिक पाळीचे विकार मासिक (Menstrual Diseases)
    मासिक पाळीमध्ये महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. डिसमेनोरिया, मेनोरेजिया, अमेनोरिया, प्री-मेन्स्ट्रुअल सिंड्रोम यासारख्या आजारांचा समावेश होतो.

  • मानसिक रोग (Psychiatric Diseases)
    यामध्ये व्यक्तीच्या विचारांवर, भावनांवर, वागणुकीवर किंवा मूडवर नकारात्मक परिणाम होतो. यामध्ये ऑटिझम, बायपोलर डिसऑर्डर, डिप्रेशन इत्यादी आजारांचा समावेश होतो.

  • संसर्गजन्य आजार (Acute or seasonal Diseases)
    बदलत्या हवामानानुसार अनेक संसर्गजन्य आजार निर्माण होतात. यामध्ये ताप, सर्दी, घशाचा संसर्ग, जुलाब, फ्लू, ऍलर्जी इत्यादी आजार होमिओपॅथीच्या औषधांनी बरे होऊ शकतात.

    (Disclaimer - या बातमीत देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com