स्त्रीशक्तीच्या सन्मानासाठी लढणाऱ्या जुलियाना लोहार यांचा सन्मान

वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी झटणाऱ्यांना ही फेलोशिप आणि अनुदान देण्यात येते.
 women's dignity
women's dignity Dainik Gomantak

अलीकडच्या वर्षात गोव्यात (goa) वेश्या व्यवसायाचा फैलाव करणाऱ्या मानवी तस्करीचे प्रमाण चिंता करावी इतके वाढले आहे. या मानवी तस्करी विरुद्ध गेली दोन दशके लढा देणाऱ्या गोव्यातल्या अर्ज या संस्थेच्या समन्वयिका जुलियाना लोहार यांना फोर्ड फाउंडेशन तर्फे देण्यात येणारा ‘फोर्ड ग्लोबल फेलो’ हा जागतिक प्रतिष्ठेचा सन्मान जाहीर झाला आहे. भारतामधून हा सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्याच आहेत. वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी झटणाऱ्यांना ही फेलोशिप आणि अनुदान देण्यात येते.

 women's dignity
Digestion ची समस्या दूर करण्यासाठी 'या' 4 टिप्स करा फॉलो

मुंबईत ‘समाजकार्य’ या विषयातून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ‘अर्ज’च्या मुंबई शाखेने त्यांची निवड कॉलेजच्या कॅम्पसमध्येच केली आणि 2002 साली त्यांनी गोव्यात काम करायला सुरुवात केली. त्या शिकत असतानाच वेश्‍या व्यवसायातून सुटका झालेल्या एका गटाबरोबर काम करत होत्या. तेव्हापासूनच त्यानी सामाजिक अन्यायाला बळी पडलेल्या स्त्रियांचा अभ्यास करायला सुरुवात केली होती. या स्त्रियांच्या सशक्तीकरणासाठी आपण काहीतरी करावे असे त्यांना तळमळीने वाटायचे. ‘अर्ज’ या संस्थेने त्यांना ती संधी मिळवून दिली.

जुलियाना म्हणतात, गोव्यात होणाऱ्या मानवी तस्करीचे प्रमाण अतिशय गंभीर असे आहे. आतापर्यंत या प्रकरणात सामील असलेला एकही गुन्हेगार दोषी ठरलेला नाही वा त्याला शिक्षा झालेली नाही. जर एकही दोषी सापडत नाही तर वेश्याव्यवसायासाठी मुलींना प्रवृत्त करणारा हा व्यवसाय कसा आटोक्यात येईल यावर त्या चिंतित होत्या पण जुलियाना आशादायक स्वरात पुढे असंही म्हणाल्या, ‘पुढील काळात राज्य सरकारच्या आणि जागृत समाजाच्या मदतीने गोव्यात चालणारी ही खूप प्रवृत्ती नक्कीच आटोक्यात येऊ शकते. ती थांबवणे हेच आमचे ध्येय आहे.’ 1998 सालापासून गोव्यात ‘अर्ज’ चे काम सुरू आहे.

 women's dignity
Diwali 2021: दिवाळीपूर्वी 'या' वस्तु करा खरेदी

‘फोर्ड ग्लोबल’चे उद्दिष्ट आहे की समाजातल्या कुप्रथांवर मात करून, लोकांना नवीन मार्ग दाखवणाऱ्या नेतृत्वाला पाठबळ देऊन, त्यांना हे सांगणे –‘तुम्ही एकट्या नाही आहात’. समाजातल्या समस्यांचे निराकरण एका जागेतून, एका व्यक्तीकडून किंवा एका वर्षात होणे शक्य नाही हे मान्य करून साऱ्या जगात, विविध लोकांकडून घडत असणाऱ्या विधायक कार्याची दखल ‘फोर्ड ग्लोबल’ घेत असते. यंदा विविध राष्ट्रातील, विविध आघाड्यांवर लढणाऱ्या 48 कार्यकर्त्यांना ही फेलोशिप जाहीर झाली आहे.

लाभलेल्या या सन्मानाबद्दल बोलताना जुलीयांना म्हणाल्या, ‘आता मला जागतिक पातळीवर अशा कामात गुंतलेल्या इतरांकडूनही खूप शिकता येईल. विचारांचे आदान-प्रदान होईल. माझ्या ज्ञानाची व्याप्ती वाढेल. यामुळे मी फार आनंदित आहे.’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com