...म्हणून तुमची दुचाकी उन्हाळ्यात कमी मायलेज देते

दैनिक गोमंतक
बुधवार, 7 एप्रिल 2021

भारतातील सर्व दुचाकीस्वारांना उन्हाळ्यात एक समस्या भेडसावते, ती म्हणजे दुचाकीचे मायलेज कमी येणे. उन्हाळ्यात उष्णतेमुळे इंजिनमध्ये इंधनाचा वापर वाढतो आणि त्याचा थेट परिणाम गाडीच्या मायलेज वर होतो.

भारतातील सर्व दुचाकीस्वारांना उन्हाळ्यात एक समस्या भेडसावते, ती म्हणजे दुचाकीचे मायलेज कमी येणे.  उन्हाळ्यात उष्णतेमुळे इंजिनमध्ये इंधनाचा वापर वाढतो आणि त्याचा थेट परिणाम गाडीच्या मायलेज वर होतो. मायलेज कमी आल्यावर आपसूकच जास्त पेट्रोल भरावे लागते आणि जास्त पैसे खर्च होतात. पेट्रोलचे भाव गगनाला भिडलेले असणाऱ्या या काळात ही गोष्ट सर्वसामान्यांना पदवडणारी ठरत नाही. (How to Increase the mileage of Two Wheeler )

सध्या देशात पेट्रोलने शंभरी (Petrol Rates) गाठली आहे, त्यात दुसऱ्या बाजूला दुचाकी वापरणाऱ्यांची संख्या देखील वाढते आहे. मायलेज कमी होण्याच्या या समस्येमुळे जवळपास प्रत्येकजण ट्रस्ट असतो. मात्र आपण जर आपल्या मोटरसायकलचे मायलेज वाढवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी काही अशा सोप्या टिप्स घेऊन आलो आहोत ज्या नक्कीच उपयोगात येऊ शकतात.

1- दुचाकीला जडआणि मोठे टायर लावू नये: टायर्स खूप जास्त जड आणि रुंद असल्यास इंजिनवर ताण निर्माण होतो. त्यामुळे हलके आणि अरुंद टायर्स वापरावे जेणेकरुन इंजिनवर दबाव येणार नाही आणि तुमची मोटारसायकल उत्तम मायलेज देईल.

2- दुचाकी इकॉनॉमी मोडचा वापर करा: कुठल्याही कंपनीची दुचाकी वापरत असाल तरी प्रत्येक दुचाकीच्या स्पीडोमीटर मध्ये  इकॉनॉमी मोड दर्शवलेला असतो.  कधीही दुचाकी चालवताना ती इकॉनॉमी मोडवर चालवण्याचा प्रयत्न करा. इकॉनॉमी मोडवर ज्या स्पीडमध्ये दुचाकी चालते ती परिस्थिती इंजिनसाठी पूरक असते, त्यामुळे तुमची दुचाकी उत्तम मायलेज देईल.  

3- इंजिन बंद करणे महत्वाचे आहे: बरेच लोक सिग्नलवर उभे असताना बाईक बंद करत नाहीत, गाडी उभी असल्याने इंधन लागणार नाही असा त्यांचा गैरसमज असतो. मात्र यावेळी इंजिन सुरु राहण्यासाठी इंधन आवश्यक असते आणि परिणामी व्यर्थ इंधन जळते. त्य्यामुळे दुचाकी अशावेळी बंद केल्याने तुम्ही जास्त इंधन वाचवू शकता तसेच प्रदूषण कमी करू शकता.

4- योग्य इंजिन तेल निवडा: कोणत्याही दुचाकीसाठी इंजिन तेल खूप महत्वाचे आहे. यामुळे इंजिन तर व्यवस्थित काम करतेच सोबतच गरम सुद्धा होत नाही. इंजिन तेल आपल्या दुचाकीच्या इंजिनला कोणत्याही नुकसानापासू वाचवण्याचे काम करत असते. त्यामुळे हे तेल वेळेत बदलल्यास दुचाकी चांगली मायलेज देते.

Health Tips: उन्हाळ्यात आरोग्यासाठी उपयुक्त; पपई खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

5- दुचाकीवर ट्रिपल सीट बसवणे टाळा: दुचाकीवर (Two Wheeler) कधीही ट्रिपल सीट बसने टाळले पाहिजे, कारण तीन जण दुचाकीवर बसल्यानंतर इंजिनवर मोठ्या प्रमाणात ताण पडतो आणि जास्त ऊर्जा निर्माण करण्यासाठी इंजिन (Fuel) जास्त इंधन घेते आणि परिणामी तुमचे मायलेज (Mileage) कमी होते. त्यामुळे कधीही ट्रिपल सीट गाडी चालवणे टाळा आणि उत्तम मायलेज मिळवा.  

 

संबंधित बातम्या