बाहेरील डिव्हाइसवर जीमेल अकाऊंट लॉगआउट करायला विसरलात तर वापरा या टिप्स 

दैनिक गोमंतक
बुधवार, 5 मे 2021

मोबाइल द्वारे आपल्या जीमेल अकाऊंटला लॉग आउट करू शकतो. मग कुठूनही कसे लॉग आउट करता येईल ते समजून घेऊया. 

आपण सर्वच जीमेलचा (Gmail) वापरत करत असतो. आपण अनेकदा कॅफे किंवा इतर कोणत्याही डिव्हाइसमध्ये काम करत असतो. कामाच्या घाईत आपण लॉगआउट (logout) करणे विसरून जातो. अचानक नंतर आठवते की आपण लॉगआउट करायचे विसरलो आहोत. आणि परत त्या जागी जाऊन लॉग आउट करणे शक्य नाही. अशा वेळेस जीमेल अकाऊंटचा डेटा (Gmail account deta) कुणी वापरणार तर नाही ना अशी भीती मनात निर्माण होते. तुमच्या सोबत जर असे काही झाले असेल तर घाबरू नका. मोबाइल द्वारे आपल्या जीमेल अकाऊंटला लॉगआउट करू शकतो. मग कुठूनही कसे लॉग आउट करता येईल ते समजून घेऊया. (how to logout Gmail  from old device follow this simple steps)

तुमच्या नावावर किती सीम कार्ड अॅक्टिव आहेत? अशी मिळवा माहिती

मोबाइल कसा करेल मदत -

तुम्ही तुमचे जीमेल अकाऊंट जर कोणत्याही नेट कॅफे किंवा इतर दुसऱ्या ठिकाणाहून लॉग इन  केले असेल आणि लॉग आउट करायला विसरले असला तर आता मोबाइल तुम्हाला मदत करेल. आपण आपल्या मोबाइल वरुणच माहिती मिळावु शकतो की कुठे लॉग इन केले होते. त्याकरिता मोबाइलमधील गुगल क्रोम ब्राऊजर वर जावुन आपले जीमेल अकाऊंट उघडावे लागेल. येथे जीमेल अॅप चा काहीही उपयोग होणार नाही.

तुम्हाला ब्रॉउजरची मदतीने ही काम करावे लागेल. जीमेल मध्ये तुमचा जीमेल आयडी व पासवर्ड लॉग इन करावे लागेल. त्यानंतर आपल्याला एक पेज दिसेल,त्या पेजला स्क्रोल करून खाली जावे लागेल. यांनतर जसे डेक्सस्टॉप ला जीमेल दिसेते तसेच मोबाइलवर दिसेल.  या पेजवरुण परत स्क्रोल कारव लागेल. स्क्रोल केल्यावर खाली लिहिलेले तपशील दिसेल. तेथे अंतिम खाते इनअॅक्टिव्हिटीचा पर्याय दिसेल. यानंतर तपशीलवार जाऊन क्लिक करावे. त्यावर क्लीक करताच आपल्यासमोर एक निविण पेज उघडेल.

मासिक पाळीत सकस आहार घ्या, वेदनेपासून सुटका मिळवा

त्यावर आपल्याला जीमेल च्या सर्व ऍक्टिव्हिटीज पाहता येतील. तुमचे जीमेल अकाऊंट कोणत्या ब्राउजरवर (Browser)आणि कोणत्या आयपी (Internet Protocol) सक्रिय आहे. तसेच जीमेल अकाऊंट सध्या कोणत्या सिस्टिम मध्ये चालू आहे ही महितीकरून घेण्यासाठी सुरक्षा तपासणीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ही प्रक्रिया करताच जीमेल अकाऊंट कोणत्या डिव्हाइस किंवा सिस्टममध्ये उघडले आहे याची माहिती मिळेल. त्यात दिलेल्या पॅनेलवर क्लिक करून आपण डिव्हाईसवरुण आपले अकाऊंट लॉग आउट करू शकतो.   
 
       

संबंधित बातम्या