Egg Cup Recipe: 'एग कप' ची चव नक्की चाखून पाहा !

Egg Cup Recipe: अंड्यापासून बनवलेली ही आगळी वेगळी रेसिपी नक्की ट्राय करा.
Egg Cup Recipe: 'एग कप' ची चव नक्की चाखून पाहा !
Egg Cup RecipeDainik Gomantak

अंडी आरोग्यासाठी लाभदायी असते. तसेच नाश्त्यासाठी अंडी हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. अंड्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे आरोग्य देखील चांगले राहते. अंड्यांमध्ये अमिनो अॅसिड व्हिटॅमिन ए, बी, बी 12, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ई देखील भरपूर असते. अंड्यापासून (Egg) बनवलेले पदार्थ मुलांसाठी आरोग्यदायी (Health) असते. आज आम्ही तुम्हाला 'एग कप' बनवण्याची स्वादिष्ट रेसिपी सांगणार आहोत. (Egg Cup Recipe news)

* 'एग कप' बनवण्यासाठी लागणारे साहित्य
6 अंडी
1 लहान टोमॅटो
3 चमचे किसलेला गाजर
मीठ आवश्यकतेनुसार
2 चमचे कोथिंबीर
1 मोठा कांदा
1 लहान शिमला मिरची (हिरवी मिरची)
4 चमचे दूध
1/4 टीस्पून काळी मिरी

Egg Cup Recipe
Pregnancy Tips: गरोदरपणात 'या' गोष्टींचे सेवन केल्यास वाढेल मुलांची स्मरणशक्ती

* एग कप बनवण्याची कृती
सर्वात आधी एका भांड्यात अंडी उघडा.नंतर अंडी चांगली फेटून घ्यावी. दूध घालून चांगले फेटून घ्या. सर्व भाज्यांचे बारीक तुकडे अंड्याच्या मिश्रणात घालावे. काळी मिरीबरोबर चवीनुसार मीठ घाला आणि मिश्रण तयार करण्यासाठी सर्व चांगले मिक्स करावे. मफिन ट्रे घ्या आणि त्यावर थोडे तेल लावा. हे मिश्रण मोल्ड्समध्ये घालावे आणि ओव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सिअसवर 15 मिनिटे बेक करा. शिजल्यावर, अंड्याचे कप मोल्ड्समधून काढा आणि केचप किंवा आवडत्या चटणीसह सर्व्ह करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.